Home मनोरंजन fashion News : ट्रेंडी फॅशन करा फॉलो - follow the trendy fashion

fashion News : ट्रेंडी फॅशन करा फॉलो – follow the trendy fashion


मुंबई टाइम्स टीम

तुम्हाला स्टायलिश लूक हवा आहे? त्यासाठी त्याला साजेसा पेहराव करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार पेहराव केल्यास तुमच्या लूकमध्ये आणखी भर पडू शकते. आजकालच्या फॅशनेबल जमान्यात व्यक्तिमत्त्वाची छाप पाडण्यासाठी तुमच्या कपाटात असलेल्या काही ठरावीक कपड्यांचा प्रभावीपणे वापर होऊ शकतो. तुमच्या व्यक्तिमत्त्वाला स्टायलिश टच देण्यासाठी कोणते लूक आजमावून बघता येतील, याविषयी……

आकर्षक दिसा

फॅशनच्या बाबतीत केवळ स्वतः अप टू डेट असून चालत नाही तर तुमच्यासोबतच तुमचं कपाटही तितकंच अपडेट असायला हवं. काळ्या रंगाचे कपडे तुम्हाला उठावदार दिसण्यासाठी मदत करतात. अनेकांकडे काळ्या रंगाचा वन पीस, फ्रॉक किंवा स्किन फिट मिडी असतेच. मिडीला जॅकेट्स किंवा छानसा पट्टा लावून तुम्हाला हवा तसा आकर्षक लूक मिळवू शकता. प्रत्येक वेळी पार्टीला जाताना तेच कपडे घालण्याऐवजी कधीतरी ड्रेसचा पर्याय निवडा. शक्य झाल्यास काळ्या रंगाचा ड्रेस घाला. जेणेकरून तुम्ही आकर्षक दिसाल.

डेनिम जॅकेटचा भन्नाट लूक

इतरांपेक्षा वेगळं दिसण्यासाठी कायम नवनवीन फॅशनेबल कपडे घालताना डेनिमला विसरून कसं चालेल? डेनिम जॅकेट तुमच्या लूकला हट के बनवण्यास मदत करतं. डेनिम जॅकेटबद्दल आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही फॅशन वर्षानुवर्षे ट्रेंडमध्ये आहे. कॉलेजला जाणाऱ्या तरुणींपासून बी-टाऊनच्या कलाकारांपर्यत सर्वांच्या कपाटात डेनिम जॅकेटला स्थान आहे. पांढऱ्या रंगाच्या टी-शर्ट सोबत हलका निळा रंग असणारं डेनिम जॅकेट घातल्यास तुमचं सौंदर्य आणखी खुलून दिसेल.

स्टायलिश लूक

पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी दिसतं. या रंगाचे कपडे तुम्ही कोणत्याही ऋतूत घालू शकता. शुभ्र कपड्यांसोबत त्यांना साजेसा नेकपीस आणि ब्रेसलेट घातल्यास तुम्हाला आणखीन स्टायलिश लूक मिळेल. पांढऱ्या शर्टसोबत नाजून डिझाइन असलेला स्कर्ट घालून इंडो वेस्टर्न लूक देखील करू शकता.

ट्रेंड आकर्षक पट्ट्यांचा…

आजकाल विविध आकाराचे आणि रंगाचे पट्टे ट्रेंडमध्ये आहेत. पट्ट्याचा उपयोग आता जीन्सपुरता मर्यादित नसून वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांना हट के लूक देण्यासाठी होऊ शकतो. मिडीपासून सैल होणाऱ्या टॉपपर्यंत सर्व कपड्यांना पट्ट्याच्या मदतीनं नवा लूक देता येईल.

ब्लेझर घेताना……

पूर्वी ब्लेझर केवळ ऑफिसपुरतंच मर्यादित होतं. पण, आताच्या काळात कौटुंबिक गेटटुगेदर किंवा मित्रांसोबत पार्टीला जाण्यासाठी देखील ब्लेझर किंवा कोट परिधान करण्यास प्राधान्य दिलं जात आहे. तुम्हीसुद्धा हा भन्नाट लूक करुन बघू शकता.

ब्लाउज असावा रंगबेरंगी!

प्रत्येक साडीवर स्वतंत्र आणि मॅचिंग ब्लाऊज ही फॅशन हळूहळू बदलत चालली आहे. एखादा स्टेटमेंट ब्लाऊज तुमच्या अनेक साड्यांना चार चांद लावू शकतो. यासाठी तुमच्या आवडीचं कोणतंही कापड विकत घ्या आणि त्याचा स्टेटमेंट ब्लाऊज शिवून घ्या. ब्लाऊजसाठी कापड निवडताना गडद रंगाचं निवडा. सोनेरी, चंदेरी किंवा चमकी असलेलं कापड घेतल्यास ते अनेक साडीवर देखील घालू शकता. बाजारात रेडिमेड ब्लाऊस देखील सहजरित्या उपलब्ध असतात, ते देखील तुम्ही विकत घेऊ शकता. वेगवेगळ्या पद्धतीनं साडीचा पदर घेऊन तुम्ही एकाच ब्लाऊजचा वापर करुन वेगवेगळे लूक मिळवू शकतो.

सिल्क साडी खुलवेल सौंदर्य

अनेक जणींचा साडी म्हणजे जिव्हाळ्याचा विषय असतो. साडी विकत घेताना एकाच पद्धतीच्या न घेता नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या घ्याव्यात; जेणेकरून प्रत्येक कार्यक्रमात तुमचा लूक वेगळा असेल. सिल्कच्या साड्या अगदी व्यवस्थित बसतात. तसंच सिल्कच्या साडीमध्ये वावरणं तुलनेनं सोपं जातं. त्यामुळे शक्य असल्यास सिल्कच्या साड्या विकत घेण्यास प्राधान्य द्या. पारंपरिकपासून ट्रेंडी साड्यांपर्यंत अनेक प्रकारच्या साड्या तुमच्याकडे असायला हव्या. हट के दागिन्यांच्या मदतीनं तुम्ही साध्या साडीला देखील आकर्षक लूक देऊ शकता.

संकलन- तेजल निकाळजे, साठ्ये कॉलेज



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

devendra fadnavis covid positive: देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण; राऊत म्हणाले… – sanjay raut wishes devendra fadnavis for speedy recovery

मुंबईः राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे. संजय राऊत यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी 'फडणवीस लवकर बरे होवोत यासाठी...

coronavirus in Nashik: coronavirus – दसऱ्याच्या पूर्वसंध्येला ६२८ करोनामुक्त – nashik reported 270 new corona cases and 5 death cases in yesterday

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकविजयादशमी अर्थात दसऱ्याच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात अवघ्या २७० संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर त्याहून सुमारे अडीच पट म्हणजेच...

Recent Comments