Home देश पैसा पैसा Fathers day : पिता होताना ही गोष्ट कधीही विसरू नका

Fathers day : पिता होताना ही गोष्ट कधीही विसरू नका


डॉ. श्रीराज देशपांडे

पितृत्व हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा असतो आणि त्याचे उत्तम नियोजन करणे आवश्यक असते. मुलांना जन्म देऊन कुटुंबविस्ताराचा विचार करत असाल तर हे समजून घेणे आवश्यक आहे, की या निर्णयाबरोबरच नियमित लसीकरण, निदान चाचण्या, औषधे, रुग्णालयात दाखल व्हायला लागणे अशा अनेक अतिरिक्त वैद्यकीय खर्चांची तरतूदही करावी लागते. आताच्या काळात वैद्यकीय उपचार किती महाग झाले आहेत हे लक्षात घेता प्रसूतीशी संबंधित अनेक वैद्यकीय उपचार आणि संबंधित खर्च बऱ्याच कुटुंबासाठी महाखर्चिक ठरू शकते आणि म्हणूनच आरोग्यविमा फार महत्त्वाचा ठरतो.

पिता बनण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही आरोग्यविमा खरेदी करणे का आवश्यक आहे, याची ही प्रमुख तीन कारणे :

पालकत्वाचा प्रवास आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी:
आज कोणत्याही चांगल्या रुग्णालयात सामान्य प्रसूतीचा खर्च २५ हजार रुपयांपासून ते ६० हजार रुपयांपर्यंत येऊ शकतो आणि सिझेरियनचा खर्च ५० हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत येऊ शकतो. हे लक्षात घेतले तर आपण प्रसूतीच्या खर्चाकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ शकत नाही, हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. आरोग्यविम्यात तुमच्या बाळाच्या जन्मापर्यंतचे कोणतेही रुग्णालयभरतीचे खर्च समाविष्ट असतात. त्यात (तुमच्या विम्याच्या अटी व शर्तींनुसार) गर्भपात आणि जन्मपूर्व व जन्मोत्तर खर्चांचाही समावेश असतो. तुम्ही निवडलेल्या प्लॅन/प्रॉडक्टच्या आधारावर तुम्ही बाळाचे लसीकरण, रुग्णवाहिकेचा खर्च, रुग्णालयात दाखल असताना केलेल्या उपचारांचा खर्च आणि इतरही खर्च भागवण्याचा उल्लेख तुमच्या प्रॉडक्टमध्ये उपलब्ध असल्यास त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता.

आपल्या पसंतीच्या ठिकाणी उपचारांचे स्वातंत्र्य:
आपल्या बाळाला सर्वोत्तम तेच मिळावे, अशी कोणाही पित्याची इच्छा असते. योग्य रकमेचा आरोग्यविमा उतरवला असेल तर तुम्हाला तुमच्या बाळासाठी भारतभरात कोठेही उपचार घेता येतो. बहुतेक आरोग्यविमा पुरवठादार काही विशिष्ट अटींच्या आधीन राहून त्यांच्या पॉलिसीअंतर्गत ठराविक रूग्णालयांच्या नेटवर्कमध्ये कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देतात. आणीबाणीच्या परिस्थितीत हे फार लाभदायक ठरू शकते.

कराच्या ओझ्यात कपात :

तुम्ही घरातील एकमेव कमावती व्यक्ती असाल, तर तुम्हाला सुविहित नियोजन करून निधी उभारण्यासाठी काळजीपूर्वक प्रयत्न करावा लागतो. वैद्यकीय एकीकडे वैद्यकीय खर्चांच्या ताणतणावांपासून मुक्ती देत असतानाच दुसरीकडे करात बचत करण्यासाठीही साह्यकारक ठरू शकतो. वैद्यकीय विमाकवच तुम्हाला फक्त अत्यावश्यक मन:शांतीच मिळवून देणार नाही, तर ते तुमचे उत्पन्न कराच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचवायलाही मदत करेल.

एका संपूर्णपणे नव्या जिवाला जगात आणणे हा अतिशय आनंददायी सोहळा आहे, पण त्यासाठी मोठा खर्चही करावा लागतो. त्यामुळेच, आपले वित्तीय भविष्य सुरक्षित करून संस्मरणीय पालकत्वाचा आनंद लुटण्यासाठी सर्वोत्तम मॅटर्निटी कव्हर असलेला सुयोग्य आरोग्यविमा निवडा.

(लेखक फ्यूचर जनराली इंडिया इन्शुरन्सचे मुख्य कामकाज अधिकारी आहेत.)Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Bhagat Singh Koshyari Says Fear Of Second Corona Wave In Maharashtra – bhagat singh koshyari :’राज्यात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता’ | Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनासाठी विविध उपाययोजना आखतानाच राज्य सरकारने धारावीसारख्या भागात यशस्वीपणे कामगिरी केली आहे. मात्र करोनाची लढाई अजून सुरूच आहे. 'मी...

Sitaram Kunte: अनुभवी आणि विश्वासार्ह : सीताराम कुंटे – sitaram kunte new chief secretary of maharashtra

अखेर सीताराम कुंटे राज्याचे मुख्य सचिव झाले. खरेतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरच ते मुख्य सचिवपदी येणार असा अनेकांचा कयास होता.  Source...

Corona Rules Violation: करोनाबाधित नियमांचा भंग करून फिरत होता घराबाहेर; गुन्हा दाखल – police file fir against corona positive man for corona rules violation

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनास रोखण्यासाठी मुंबईत लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. गोवंडी पोलिस ठाण्यापाठोपाठ सोमवारी चेंबूर पोलिस ठाण्यात...

Recent Comments