Home आपलं जग करियर final year exams 2020: 'परीक्षा रद्द' निर्णयाला राज्यपाल कोश्यारी यांचा विरोध -...

final year exams 2020: ‘परीक्षा रद्द’ निर्णयाला राज्यपाल कोश्यारी यांचा विरोध – final year exams 2020 governor bhagat singh koshyari wrote letter to cm


मुंबई: ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा अभूतपूर्व असून त्याची अंमलबजावणी झाल्यास विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात पडल्यासारखे होईल, असे सांगत या निर्णयाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विरोध दर्शवला आहे. सर्व विद्यापीठांचे कुलपती या नात्याने कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांचे म्हणणे कळवले असून, ‘महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याला अनुसरूनच निर्णय घ्यावा,’ असे त्यांनी सांगितले आहे.

‘प्रसार माध्यमांतून मला मुख्यमंत्र्यांनी परीक्षा रद्द केल्याचा निर्णय घेतल्याचे समजले आणि आश्चर्याचा धक्का बसला. मी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे आपले मत कळवले असले तरी त्यांची त्यावर अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही,’ असे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना २ जून रोजी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. राजभवनने त्याबाबतचे पत्रक जारी केले आहे.

‘उच्च व तंत्र शिक्षण विभागाने स्थापन केलेल्या विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या समितीने याबाबत सर्व प्रकारच्या पर्यायांचा विचार करून अहवाल ६ मे रोजीउच्च व तंत्र शिक्षण विभागाला दिला आहे. मात्र, तो अहवाल अद्याप आपल्याला प्राप्त झालेला नाही. विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपण केलेल्या संवादादरम्यान अनेक कुलगुरूंनी परीक्षा घेण्याची तयारी असल्याचे आपल्याला सांगितले आहे’, असेही राज्यपालांनी पत्रात म्हटले आहे.

‘केंद्रीय गृह विभागातर्फे विविध राज्यांना व राज्यांमधील बोर्डांना परीक्षा घेण्याबाबतची नियमावली जारी केली गेली आहे. त्यामुळे सीबीएसई, आयसीएसई बोर्ड या करोना साथीतही परीक्षा घेण्याची तयारी करत आहेत. जर इतक्या लहान मुलांच्या परीक्षा घेतल्या जाऊ शकतात तर त्यांच्यापेक्षा मोठ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा विद्यापीठे नक्कीच घेऊ शकतात’, असेही राज्यपाल पत्रात म्हणतात.

वैद्यकीय, वास्तुविषारद, कायदा आदी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक संस्थांकडेही नोंदणी करावी लागते. या संस्था त्यांना कामाचा परवाना देतात. हे विद्यार्थी ठरलेल्या निकषात बसत नसल्यास त्यांना हे परवाने देण्यातही अडचणी येऊ शकतात याकडेही राज्यपालांनी लक्ष वेधले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ind vs aus first ODI: टीम इंडियासाठी अलर्ट; पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाचे पारडे जड, जाणून घ्या कारण – ind vs aus first odi australia can...

नवी दिल्ली: भारतीय संघ आठ महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. उद्यापासून म्हणजेच २७ नोव्हेंबरपासून भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. भारताच्या दौऱ्याची...

Recent Comments