Home देश Finance Minister Announcement: वादग्रस्त सुधारणांची ही वेळ नाही, सीतारामन यांना काँग्रेसचे उत्तर...

Finance Minister Announcement: वादग्रस्त सुधारणांची ही वेळ नाही, सीतारामन यांना काँग्रेसचे उत्तर – aatmnirbhar bharat abhiyan congress criticises fifth installment of announcements by fm nirmala sitharaman


नवी दिल्लीः ‘आत्मनिर्भर भारत अभियान’नुसार २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज देशासमोर मांडले गेले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज या पॅकेजमधील शेवटच्या टप्प्यातील आर्थिक घोषणा केल्या. यात धोरणात्मक बदलांची त्यांनी माहिती. यात काही आर्थिक सुधारणाही लागू करण्यात आल्या. ज्यावर काँग्रेसने टीका केलीय. सार्वजनिक क्षेत्रात (PSE) सुधारणा जाहीर करत सर्व क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले करण्यात आले आहे. यासोबतच इन्सॉल्वेन्सी अॅण्ड बँक्रप्टसी कोड ( IBC) मध्येही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. पण वादग्रस्त सुधारणा करण्याची ही वेळ नाही, असं म्हणत काँग्रेसने सरकारवर निशाणा साधला आहे.

अर्थमंत्र्यांनी ज्या काही घोषणा केल्या त्या गरीब, मजूर, शेतकरी आणि सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी (MSME) नाहीए. सरकारने अनेक सुधारणांची घोषणा केली. ढासळलेली अर्थव्यवस्था आणि उद्योग – व्यवसायांना चालना देण्याची ही वेळ आहे. वादग्रस्त सुधारणांच्या घोषणांची नाही. या घोषणांचा गरीब, मजूर आणि MSME क्षेत्राशी काहीही संबंध नाही. त्यांना तातडीने मदत मिळण्याची गरज आहे. हे भारतीय नागरिक आहेत. ते दयेसाठी आसुसलेले नाहीत, असं काँग्रेसचे नेते आनंद शर्मा म्हणाले.

कर्ज नको मदत द्या

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची पत्रकार परिषद संपताच काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आनंद शर्मा यांनी माध्यमांशी संवाद साधला. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी सरकारकडे कुठलाही ठोस विचार नाहीए, हे अर्थमंत्र्यांच्या शेवटच्या टप्प्यातील घोषणांवरून आज स्पष्ट झालंय. पंतप्रधानांनी २० लाख कोटींच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली. त्याचं आम्ही स्वागत करतो. पण कर्जाच्या ज्या घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या त्याचा विशेष आर्थिक पॅकेज म्हणता येणार नाही. कोट्यवधी नागरिकांचा हातचा रोजगार गेला आहे. कारखाने बंद आहेत. सरकाने कर्जाद्वारे MSME क्षेत्रा आर्थिक मदत करण्याची गजर होती. ज्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार त्यांना करता आले असते, असं आनंद शर्मा म्हणाले.

सोनिया गांधींना हात जोडून विनंती; मजुरांच्या मुद्द्यावर राजकारण करू नका: सीतारामन

महाराष्ट्रानंतर पंजाब, तामिळनाडूतही लॉकडाऊनमध्ये वाढ

रेशन हे मजुरांचा अधिकार

८ कोटी स्थलांतरीत मजूर अजूनही रस्त्यांवर विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. ते आपल्या घरी पोहोचलेले नाहीत. तसंच अर्थमंत्र्यांनी स्थलांतरीत मजुरांना मोफत रेशन देण्याची घोषणा केली. हा मजुरांचा अधिकार आणि त्यांनी उपकार केलेले नाहीत. अजूनही या मजुरांना घरी सोडण्यासाठी चांगली व्यवस्था करण्यात आलेली नाही. यातून सरकारने शिकलं पाहिजे. त्रुटी कुठे राहिल्या हे सरकारने तपासले पाहिजे, असं आनंद शर्मा म्हणाले.

२१ टक्के महिलांचीच जनधन खाती आहेत. यामुळे थेट मदत पोहोचवण्यासाठी मनरेगा खात्यात पैसे जमा करा. याचा जास्तीत-जास्त महिलांना लाभ होईल. शेतकऱ्यांपासून ते फेरीवाल्यांपर्यंत सर्वांना कर्ज घेण्याचं आवाहन केलं जात आहे, ही कुठली आर्थिक मदत आहे? असा सवाल काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केलाय.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

padma awards 2021: पद्म पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातील ६ जणांचा गौरव, सिंधुताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणेंचा समावेश – padma awards 2021 sindhutai sapkal and girish...

नवी दिल्लीः प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातील एकूण सहा जणांचा समावेश आहे. सिंधुताई सपकाळ आणि गिरीश...

bike-truck accident in nashik: साक्री-शिर्डी मार्गावर अपघातांची मालिका – two wheeler bike rider died in road accident in nashik

म. टा. वृत्तसेवा, सटाणासाक्री-शिर्डी या राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून सलग तिसऱ्या दिवशी ट्रॅक्टर-दुचाकी मोटारसायकलचा समोरासमोर अपघात होवून दुचाकी चालक समीर पप्पू...

Recent Comments