Home विदेश first execution of female: अमेरिकेत सात दशकात पहिल्यांदा महिलेला मृत्यूदंड; कृत्य ऐकाल...

first execution of female: अमेरिकेत सात दशकात पहिल्यांदा महिलेला मृत्यूदंड; कृत्य ऐकाल तर संताप येईल – us executes lisa montgomery, the only female on federal death row


वॉशिंग्टन: अमेरिकेत जवळपास ७० वर्षानंतर एका महिलेला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास विषारी इंजेक्शन देऊन या दोषी महिलेला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. माणुसकीला काळीमा फासणारा गुन्हा १६ वर्षापूर्वी घडला होता. या गुन्ह्यासाठी कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली.

लीसा मोंटगोमेरी हे असा दोषीचे नाव असून मृत्यूच्या वेळी ती ५२ वर्षांची होती. लीसा मोंटगोमेरीला शिक्षा देताना तिची अंतिम इच्छा विचारण्यात आली होती. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरील मास्क काढण्यात आला. मात्र आपली कोणतीही अखेरची इच्छा नसल्याचे तिने सांगितल्यानंतर लीसाला इंजेक्शन देण्यात आले. लीसाच्या वकिलांनी या शिक्षेवर संताप व्यक्त करत या शिक्षेत सहभागी असलेल्यांना शरम वाटली पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली.

वाचा: दुबईचे शाही कुटुंब करणार ‘या’ दुर्मिळ पक्ष्यांची शिकार; पाकिस्तानची मंजुरी

वाचा: कुत्र्याचा पट्टा घालून पतीला फिरवत होती पत्नी; ‘कारण’ ऐकाल तर हैराण व्हाल!

कोर्टाने सुनावली मृत्यूदंडाची शिक्षा

अमेरिकेतील कँसास राज्यात राहणाऱ्या लीसा मोंटगोमेरी या महिलेने एका गरोदर महिलेची निर्घुण हत्या करत तिच्या पोटातील बाळ घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. तिला अटक करण्यात आल्यानंतर कोर्टात खटला उभा राहिला. कोर्टाने या महिलेला दोषी ठरवले. या महिलेने केलेले कृत्य अतिशय निर्घुण असल्याचे सांगत तिला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. मोंटगोमेरीला इंडियानातील तेर्रे हाउतेमध्ये एका मध्यवर्ती कारागृहात मृत्यूदंड देण्यात आला.

वाचा: अमेरिकेत करोनाचे मृत्यू तांडव; एकाच दिवसात चार हजारांहून अधिक बळी

काय होते प्रकरण?

हे प्रकरण १६ वर्ष जुने आहे. १६ डिसेंबर २००४ रोजी मोंटगोमेरीने स्किडमोर शहरात २३ वर्षीय बॉबी जो स्टीनेटची हत्या केली होती. त्यावेळी तिने बॉबीचा रश्शीने गळा दाबून हत्या केली. त्यानंतर चाकूने तिचे पोट फाडून बाळ पळवले. हत्या झाली तेव्हा बॉबी ही आठ वर्षाची होती. पोलिसांनी या हत्येचा तपास सुरू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरोपीला अटक केली होती. बॉबीच्या पोटातून पळवून आलेल्या मुलीचे वय सध्या १६ वर्ष आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

IPL 2021 Will Chennai Super Kings Retain Suresh Raina – IPL 2021: सुरेश रैनाबाबत CSK घेणार मोठा निर्णय; काय चाललय संघ व्यवस्थापनाच्या मनात… |...

नवी दिल्ली: आयपीएलच्या १३व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी सर्वात खराब झाली होती. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच सीएसकेला प्लेऑफमध्ये पोहोचता आले नाही. २०२०च्या आयपीएलचा...

Recent Comments