Home देश पैसा पैसा fiscal deficit likely to increased: कर संकलन आटले ; वित्तीय तूट वाढणार...

fiscal deficit likely to increased: कर संकलन आटले ; वित्तीय तूट वाढणार – fiscal deficit will increase as tax revenue miss the target


नवी दिल्ली : कर महसूल कमी झाल्याने सरकारची आर्थिक घडी विस्कटणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहा वर्षातील कार्यकाळातील सर्वात मोठ्या वित्तीय तुटीला सरकारला सामोरे जावे लागणार आहे. तूट वाढल्यास भारताची पत मानांकनांची जोखीम वाढेल, असे बोलले जात आहे. फीच आणि स्टॅंडर्ड अँड पुअर्स यासारख्या कंपन्या देशाच्या पत मानांकनात कपात करू शकतात असे जाणकारांचे म्हणणे आहे.

चालू आर्थिक वर्षात आर्थिक मंदीने कर संकलन निर्धारीत उद्दिष्टापेक्षा जवळपास १.७० लाख कोटींनी कमी राहील, असा अंदाज सरकारकडून व्यक्त करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात त्यापेक्षा आणखी घट होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. अर्थ खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार यंदा कर संकलनात १.७० लाख कोटींहून अधिक घट होऊ शकते.

वर्षाच्या चौथ्या तिमाहीत करोनामुळे लॉकडाउन घोषीत करण्यात आला होता. करोनाची साथ रोखण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देशव्यापी टाळेबंदी जाहीर करण्यात आली. त्याला नुकताच दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली. आता १७ मेपर्यंत देशव्यापी लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. देशात झोननुसार लॉकडाउन शिथिल करण्यात आला आहे. त्यानुसार उद्योगधंद्यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र तत्पूर्वी अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे.

कॉर्पोरेट अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे यंदा त्यांच्याकडून सरकारला होणार कर भरणा रोडवण्याची शक्यता आहे. तसेच कर्जात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. चालू वर्षासाठी सरकारने वित्तीय तूट ही जीडीपीच्या ३.५ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र करोना व्हायरसने मंदीची शक्यता बळावली आहे. अर्थचक्र थांबल्याने विकासदर नीचांकी पातळी गाठणार आहे. तर कर महसूल आणि खर्च यातील तफावत जीडीपीच्या ८ टक्क्यांपर्यंत वाढेल, असे भाकीत काही संस्थांनी केले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

mumbai maximum temperature: मुंबईच्या तापमानात वाढ – mumbai weather : mumbai maximum temperature increases

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबईसह राज्याच्या काही शहरांत पहाटे अजूनही किंचितसा गारवा जाणवत असला तरी हळुहळू तापमान वाढत आहे. किमान आणि कमाल तापमान...

MNS-BJP alliance: Nashik: मनसेच्या ‘या’ दोन निर्णयांमुळं नव्या राजकीय समीकरणांची चर्चा – bjp mns may form alliance to fight nashik municipal election

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकमहापौर निवडणुकीपाठोपाठ स्थायी समिती निवडणुकीतही मनसेने भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र...

Recent Comments