Home शहरं पुणे folk artist: लॉकडाऊनचा 'खेळ'; तमाशा लोककलाकारांवर उपासमारीची वेळ - folk artist gets...

folk artist: लॉकडाऊनचा ‘खेळ’; तमाशा लोककलाकारांवर उपासमारीची वेळ – folk artist gets in trouble due to lockdown


म. टा. प्रतिनिधी, पुणेः करोना विषाणू आणि टाळेबंदीमुळे लावणी कार्यक्रम बंद असल्याने हजारो तमाशा लोककलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तीन महिन्यांपासून उत्पन्न नाही आणि पुढे उत्पन्न कधी मिळणार याची खात्री नसल्याने या लोककलाकारांच्या जगण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. लोककलाकारांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना आपल्या परिस्थितीला वाचा फोडून छोटेखानी कार्यक्रमास परवानगी देण्याची मागणी सरकारकडे केली.

ठाण्यात २ ते १२ जुलैपर्यंत कडेकोट लॉकडाऊन; ‘हे’ आहेत नवे नियम

‘महाराष्ट्रात सुमारे ६५ सांस्कृतिक कला केंद्रात १३ ते १५ नृत्य कलाकार, गायक, वादक, मदतनीस आपल्या कलेचे सादरीकरण करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. करोनामुळे तीन महिन्यांपासून कार्यक्रम बंद असल्याने कलाकारांच्या आणि केंद्र चालकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे,’ याकडे महाराष्ट्र सांस्कृतिक कला थिएटर मालक संघटनेचे अध्यक्ष डॉ. अशोक जाधव यांनी लक्ष वेधले. ‘ सरकारने काही नियम आणि अटी लागू करून सांस्कृतिक कला केंद्रात छोटेखानी कार्यक्रम सुरू करण्यास परवानगी द्यावी,’ अशी मागणी त्यांनी केली.

वाढीव बिलाचं खापर ‘वर्क फ्रॉम होम’वर; ऊर्जामंत्र्यांचं अजब तर्कट!

उपाध्यक्ष राजाभाऊ चौधरी म्हणाले, ‘कलाकारांपर्यंत कसलीही मदत पोहोचलेली नाही. आमचा विचार झालेला नाही. कार्यक्रम सुरू करण्यास परवानगी द्यावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन दिले आहे. कलाकारांना आर्थिक मदत, लोक कलावंतांसाठी तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर लोककला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना, सांस्कृतिक केंद्राची स्थापना आणि लॉकडाउननंतर लावणी महोत्सव आयोजित करावा, अशा मागण्या केल्या आहेत. सरकारने कलाकारांचे जगणे सुखकर करावे.’

‘अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कार्यक्रम सुरू होत नाहीत; तोपर्यंत आयुष्य रुळावर येणार नाही. कलाकारांच्या जगण्याला सरकारने आधार द्यावा,’ अशी कळकळ कलावंत रेश्मा परितेकर, राजू तांबे व सुरेखा पवार यांनी व्यक्त केली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

doorstep banking become popular: ‘बँक आपल्या दारी’; या बँकांकडून मिळेत तुम्हाला घरीच बँंकिंग सेवा – bank at doorstep become popular

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : सरकारी बँकांनी ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी, तसेच अधिकाधिक ग्राहक आकर्षून घेण्यासाठी सप्टेंबर २०२०मध्ये एकत्र येत 'बँक आपल्या दारी' हा उपक्रम...

maharashtra jobs latest news: Maharashtra Jobs: लॉकडाऊन काळात दोन लाख नोकऱ्या!; ठाकरे सरकारने केला ‘हा’ दावा – two lakh jobs given during lockdown says...

मुंबई: रोजगाराच्या क्षेत्रात राज्य सरकारने मोठे काम केले आहे. २०२० या संपूर्ण वर्षाच्या कालावधीत राज्यातील तब्बल १ लाख ९९ हजार ४८६ बेरोजगारांना रोजगार...

Udayanraje Bhosale: मी सुद्धा भरपूर खाज असलेला खासदार आहे; उदयनराजेंचा रोख कोणाकडे? – udayanraje bhosale inaugration at grade separator in satara

साताराः 'शहरातील पोवई नाका परिसरातील मागील पावणेतीन वर्ष अव्याहत सुरू असलेले ग्रेड सेपरेटर चे काम पूर्णत्वाला जाऊन त्याचे उद्घाटन आम्ही केले आता ग्रेट...

Anna Hazare Writes PM Modi: Farmers Protest: स्पष्ट काय ते सांगून टाका, विषय सोडून देऊ; अण्णांचे मोदींना निर्वाणीचे पत्र – anna hazare writes to...

अहमदनगर: ‘जर मागण्या मान्य करायच्या नसतील तर सरकारने स्पष्ट सांगावे, त्यामुळे मागणी करणारे लोक विषय तरी सोडून देतील. देश चालविणाऱ्या सरकारला खोटे बोलणे...

Recent Comments