Home क्रीडा Football : लॉकडाऊनमध्ये क्रीडा चाहत्यांसाठी खूष खबर - football league will be...

Football : लॉकडाऊनमध्ये क्रीडा चाहत्यांसाठी खूष खबर – football league will be started in belarus


देशभरात ३मेपर्यंत लॉकडाऊन आहे. सध्याच्या घडीला देशात करोना व्हायरस पसरलेला आहे. त्यामुळे यंदाची आयपीएल पुढे ढकलण्यात आलेली होती. त्याचबरोबर बऱ्याच स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. पण क्रीडा चाहत्यांसाठी एक खूष खबर आहे. कारण सध्याच्या घडीला एक लीग सुरु होणार आहे.

करोना व्हायरसमुळे सर्वच चिंतेत आहेत. सर्व लोकं घरात बसून आहेत आणि त्यांना कंटाळा आला आहे. त्यांच्यासाठी ही स्पर्धा सुरु होणार असल्याची खूष खबर मिळाली आहे. या लीगचा आनंद लवकरच भारतीयांना घेण्यात येणार आहे.

सध्याच्या घडीला बेलारूसमध्ये फुटबॉल लीग सुरु करण्यात येणार आहे. या लीगमधील सामन्यांचा आनंद भारतीयांना घरी बसून येता येणार आहे. यापूर्वी काही सामने भारतामध्ये दाखवण्यात आलेले होते. पण हे सामने यापूर्वी झालेले होते. त्यामुळे हे सामने पाहण्याचा जास्त आनंग भारतीयांना घेता आला नव्हता. पण आता भारतीयांना घरी बसून सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. या सामन्यासाठी ठराविक चाहत्यांनाच सामने पाहता येणार आहे.

याबाबत एक चाहते याहोर खावान्स्की यांनी सांगितले की, ” यापूर्वी झालेल्या सामन्यांना मी गेलो होतो. या सामन्यासाठी फक्त ३०० चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला होता. त्यामुळे चाहते स्टेडियममध्ये सर्व काळजी घेऊन बसले होते. त्यामुळे यापुढेही या सामन्यांना मी जात राहणार आहे.”

बेलरुसची लोकसंख्या जवळपास एक कोटी एवढी आहे. देशामध्ये ९५९० एवढे करोना रुग्ण आढळले आहेत. पण तरीही बेलारुसने फुटबॉल लीग सुरु ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण सध्याच्या घडीला जगभरात जवळपास सर्वच गोष्टी ठप्प झालेल्या आहेत. त्यामुळे सर्वच देशांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे आणि त्यांच्यावर आर्थिक संकट येऊ शकते, असे म्हटले जात आहे. पण या लीगच्या माध्यमातून काही तरी आर्थिक मदत बेलारुस आणि त्यांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघटनेला होऊ शकते. त्यामुळे त्यांनी ही लीग सुरु करण्याता निर्णय घेतल्याचे समजत आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments