Home आपलं जग करियर free online courses: NPTEL: अभ्यासक्रमांचा ऑनलाइन पर्याय - free online courses of...

free online courses: NPTEL: अभ्यासक्रमांचा ऑनलाइन पर्याय – free online courses of nptel


दहावीच्या मुलांसाठी अभ्यासाच्या टिप्सआनंद मापुस्कर, करिअर मार्गदर्शक

नॅशनल प्रोग्रॅम ऑन टेक्नॉलॉजी एन्हान्स्ड लर्निंग (एन.पी.टी.ई.एल.) या उपक्रमाची सुरुवात सात आयआयटी (मुंबई, दिल्ली, कानपूर, खरगपूर, मद्रास, गुवाहाटी व रुरकी) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरु (आयआयएससी) यांच्या पुढाकारानं २००३ साली झाली. इंजिनीअरिंग आणि मुलभूत विज्ञान शाखेतील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांवर आधारित वेब व व्हिडीओ कोर्सेस सुरुवातीच्या काळात उपलब्ध करुन देण्यात आले. यामध्ये कालांतरानं पदव्युत्तर मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमांचा देखील समावेश झाला.

इंजिनीअरिंग, मूलभूत विज्ञान आणि काही निवडक मानव्यशास्त्र व सामाजिक शास्त्रामधील अभ्यासक्रमांचा जगामधील सर्वात मोठा ऑनलाइन संग्रह (रिपॉझिटरी) म्हणून एन.पी.टी.ई.एल.ची ओळख आहे. एन.पी.टी.ई.एलच्या युट्यूब चॅनेलही विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. ६४००० तासांहून अधिक कालावधीचे व्हिडीओ अभ्यास साहित्य उपलब्ध आहे. २०१४ पासून एन.पी.टी.ई.एलने ऑनलाइन अभ्यासक्रम (मूक्स) देण्यास सुरुवात केली. हे अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर आय.आय.टी/आय.आय. एससीकडून प्रमाणपत्र देखील देण्यात आली. त्यामुळे घरी बसूनच आय.आय.टीमधून शिक्षण घेण्याची संधी यामुळे प्राप्त झाली.

एन.पी.टी.ई.एलने विद्यार्थ्यांना रोजगारासाठी तयार करण्यासाठी आणि योग्य त्या उच्च शिक्षणाकडे जाण्यास मदत व्हावी या हेतूनं काही ऑनलाइन अभ्यासक्रमांची योजना केली. ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून ४, ८ वा १२ आठवड्यांचे ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध केले आहेत. हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांशी सुसंगत आहेत. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी आणि शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जात नाही. जर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र हवे असेल तर रु. १००० इतकी फी आकारण्यात येते. भारतातील १००हून अधिक शहरामध्ये संगणकीकृत परीक्षा घेण्यात येते.

विद्यापीठ अनुदान आयोग आणि ए.आय.सी.टी.ईने महाविद्यालये तसेच विद्यापीठांना प्रत्येक सत्रामध्ये किमान एकतरी ऑनलाइन अभ्यासक्रम क्रेडीट ट्रान्सफरसाठी पात्र धरावा यासाठी प्रोत्साहीत केलं आहे. यासाठी २०१६ मध्ये एक विनिमय (रेग्युलेशन) देखील काढलं आहे. करोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पुढील शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या पदवी अभ्यासक्रमापैकी काही क्रेडीट ऑनलाइन अभ्यासक्रम करावेत, यासाठी पारंपरिक विद्यापीठे विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ‘स्वयं’ आणि एन.पी.टी.ई.एलच्या वेबसाइटवर जाऊन आपल्या विषयासंबंधीच्या ऑनलाइन अभ्यासक्रमांची माहिती लॉकडाऊनच्या काळात मिळवणं सयुक्तिक राहील.

एन.पी.टी.ई.एलने काही महाविद्यालयांसोबत पार्टनरशिप केली आहे. ही महाविद्यालये एन.पी.टी.ई.एलचे लोकल चॅप्टर्स म्हणून काम करतात. उद्योगांना हव्या असलेल्या कौशल्याने आणि नवीनतम ज्ञानाने संपन्न विद्यार्थी घडवण्यासाठी काही अभ्यासक्रमांची निर्मिती केली जाते. यासाठी उद्योगांना ‘इंडस्ट्री असोसिएट’ म्हणून सहभागी करुन घेतले जाते.

एरोस्पेस इंजिनीअरिंग, अप्लाइड मेकॅनिक्स, आर्किटेक्चर व प्लॅनिंग, बायोटेक्नोलॉजी व बायोइंजिनीअरिंग, केमिकल इंजिनीअरिंग, केमिस्ट्री व बायोकेमिस्ट्री, सिव्हिल इंजिनीअरिंग, कम्प्युटर सायन्स व इंजिनीअरिंग, डिझाइन इंजिनीअरिंग, इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग, ह्युमॅनिटीज व सोशल सायन्स, मॅनेजमेंट, मॅथेमॅटिक्स, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, मेटॅलर्जी व मटेरियल्स इंजिनीअरिंग, मल्टीडिसिप्लिनरी, ओशन इंजिनीअरिंग, फिजिक्स, टेक्सटाइल इंजिनीअरिंग या विषयामधील ३९१ ऑनलाइन अभ्यासक्रम एन.पी.टी.ई.एलने स्वयं प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिले आहेत.

वेबसाइट- https://nptel.ac.in

आयसीएआयचे मोफत शॉर्ट टर्म ऑनलाइन कोर्स

दहावीच्या मुलांसाठी अभ्यासाच्या टिप्स

परदेशी शिक्षण ‘लॉक’डाऊनSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

health care tips in marathi : काढ्याचं अतिसेवन करताय? मग जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेली ही माहिती – excessive consumption of kadha can be dangerous...

रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या काढ्यांची माहिती देणारे व्हिडीओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ते बघून अनेक जण काढ्याचं सेवन करतात. कित्येकदा करोना...

Recent Comments