सलमाननं आता स्वत:चं ग्रुमिंग अँड पर्सनल केअर ब्रँड लाँच केला आहे.
मुंबई, 24 मे : अभिनेता सलमान खान (salman khan) ईदनिमित्त चाहत्यांसाठी एक अनोखी भेट घेऊन आला आहे. क्लोथिंग ब्रँडनंतर आता सलमाननं स्वत:चं ग्रुमिंग अँड पर्सनल केअर ब्रँड लाँच केला आहे, ज्याचं नाव आहे FRSH. या ब्रँडचं पहिलं प्रोडक्ट आहे ते म्हणजे हँड सॅनिटायझर (hand sanitizer). सध्या कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी अनेक जण सॅनिटायझरचा वापर करत आहेत. त्यामुळे सलमानही तुमच्यासाठी स्वत:च्या ब्रँडचं सॅनिटायझर घेऊन आला आहे.
सलमाननं इन्स्टाग्रामवर याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या ब्रँडची ओळख करून देताना सलमान म्हणाला, “हा तुमचा आणि माझा म्हणजे आपला ब्रँड आहे. तुमच्यासाठी आणखी खूप काही आणलं जाईल, सध्या तरी सॅनिटायझर घेऊन आलो आहे. हे तुमच्यासाठी आहे, जेणेकरून तुम्ही सुरक्षित आणि स्वच्छ राहाल”
कोरोनाव्हायरसपासून वाचण्यासाठी तुम्ही सॅनिटायझर वापरत आहात. तुम्हालाही तेच तेच सॅनिटायझर वापरून कंटाळा आला असेल, तर आता सलमानच्या ब्रँडचं सॅनिटायझर ट्राय करण्यास हरकत नाही.
हे वाचा – KBC 12 चं Registraton संपलं, या बॉलिवूड अभिनेत्रीशी संबंधीत होता शेवटचा प्रश्न
First Published: May 24, 2020 09:51 PM IST