Home शहरं मुंबई Fuel Price Hike: fuel price hike: शहीदांचं बलिदान आणि इंधन दरवाढ; मोदी...

Fuel Price Hike: fuel price hike: शहीदांचं बलिदान आणि इंधन दरवाढ; मोदी सरकारला काँग्रेस घेरणार – congress will protest against modi government over fuel price hike


मुंबई: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचं चीनबाबतचं कुचकामी धोरण आणि करोना संकट काळातही देशभरात वाढत चाललेल्या इंधन दरवाढीवरून काँग्रेसने मोदी सरकारला घेरण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यात २६ जून रोजी शहिदों को सलाम दिवस साजरा करून चीनप्रश्नी केंद्राला जाब विचारण्यात येणार आहे. तर २९ जूनला पेट्रोल- डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

चीनने सीमेवर आपले २० जवान मारले. मोदी सरकारने देशाला विश्वासात न घेता ही माहिती दडवण्याचा प्रयत्न केला. तसेच चीनी सैन्याने सीमा ओलांडली नाही असं सांगत चीनला फायदा होणारी भूमिका घेऊन मोदींनी देशाचा तसेच आपल्या शहीद जवानांचा अपमान केला आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणार आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. भारताच्या २० शहीद जवानांप्रती आदरभावना व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी २६ जूनला ‘शहिदों को सलाम’ दिवस पाळला जाणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा पुतळा, शहीद स्मारक किंवा स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकासमोर एकत्र येऊन मेणबत्या पेटवून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. कोणतीही घोषणाबाजी न करता शांततेने हे आंदोलन केले जाणार आहे. तसेच याच दिवशी #SpeakupForOurMartyrs ही ऑनलाईन मोहीमही सोशल मीडियावर चालवली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

‘करोनाच्या कॉलर ट्यूनमागे काय षडयंत्र आहे; मोदींनी खुलासा करावा’

इंधन दरवाढीविरोधात २९ जूनला आंदोलन

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती निच्चांकी पातळीवर खाली आलेल्या असतानाही मोदी सरकार त्याचा थेट लाभ सामान्य जनतेला होऊ देत नाही. उलट सलग १९ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढच केली जात आहे. त्याचा निषेध म्हणून सोमवारी २९ जूनला केंद्र सरकारच्या विरोधात सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी १० ते १२ या वेळत दोन तास धरणे आंदोलन करून इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी केली जाणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम करताना सोशल डिस्टन्स ठेवून तसेच मास्क लावूनच करावेत याच्या सूचना सर्वांना देण्यात आलेल्या आहेत. याच दिवशी #SpeakuponPetroleumPrices ही ऑनलाईन मोहिम सोशल मीडियावर चालवली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

करोनाचं लक्षण नाही; पण अचानक मृत्यू; नव्या प्रकारामुळे चिंता वाढली

ब्लॉकस्तरावर धरणे आंदोलन

त्यानंतर ३० जून ते ४ जुलै दरम्यान ब्लॉक व तालुका स्तरावर धरणे आंदोलन केली जाणार आहे. या दोन्ही कार्यक्रमासाठी विभागनिहाय समन्वयक नियुक्त करण्यात आले असून नागपूरसाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, अमरावतीसाठी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, मुंबईसाठी आमदार अमीन पटेल, कोकणसाठी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, उत्तर महाराष्ट्रासाठी आ. कुणाल पाटील, मराठवाड्यासाठी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर, पश्चिम महाराष्ट्रासाठी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, फ्रंटल व सेल समन्वयक म्हणून गृहराज्य मंत्री सतेज पाटील तर सोशल मीडिया समन्वयक अभिजित सपकाळ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

औरंगाबाद, जालन्यात अतिवृष्टी; घरांमधील पाणी उपसण्यासाठी अग्निशमन जवान धावलेSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

maharashtra budget 2021: राज्यात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? अर्थसंकल्पात मोठ्या घोषणेची शक्यता – maha vikas aghadi government trying to give concession in petrol and...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईपेट्रोल व डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढ झाली असल्याने यातून राज्यातील नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी राज्य सरकार...

THE NEW JIOPHONE 2021 OFFER: Reliance Jio चा नवा धमाका, ७४९ रुपयांत वर्षभर अनलिमिटेड कॉल आणि डेटा – jiophone 2021 offer announced with 2...

हायलाइट्स:रिलायन्स जिओची जबरदस्त ऑफर १ मार्च २०२१ पासून या ऑफरला सुरुवात होणार THE NEW JIOPHONE 2021 OFFER असे नाव नवीन आणि जुन्या ग्राहकांना...

Recent Comments