Home देश पैसा पैसा fuel price stable today: इंधन दरवाढीला ब्रेक ; आंदोलनानंतर पेट्रोलियम कंपन्या नरमल्या...

fuel price stable today: इंधन दरवाढीला ब्रेक ; आंदोलनानंतर पेट्रोलियम कंपन्या नरमल्या – petrol and diesel price stable on wednesday


मुंबई : जागतिक बाजाराशी सुसंगत असूनही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जूनमधील तीन आठवडे वाढत होत्या. मात्र सोमवार आणि मंगळवार देशभरात झालेल्या आंदोलनाची दखल पेट्रोलियम कंपन्यांना घ्यावी लागली आहे. एकीकडे देश करोना संकटाशी झुंज देत असताना पेट्रोल-डिझेल दरवाढीने जनतेत निर्माण झालेला असंतोष शांत करण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळेच आज बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी कंपन्यांनी दरवाढ टाळली आणि पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे ठेवले.

विमादावा प्रक्रियेत गोंधळला आहात; या गोष्टी जाणून घ्या
मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८७.१९ असून डिझेल दर ७८.८३ रुपयांवर कायम आहे. राजधानी दिल्लीत बुधवारी पेट्रोलचा भाव ८०.४३ रुपयांवर स्थिर आहे. डिझेलचा भाव ८०.५३ रुपये प्रती लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल ८३.६३ रुपये आणि कोलकात्यात ८२.१० रुपये झाले आहे. चेन्नईत डिझेल ७७.७२ रुपये आणि कोलकात्यात ७५.६४ रुपये झाले आहे. त्यात मंगळवारच्या तुलनेत कोणतीही वाढ झाली नाही.

‘स्विगी’ बनली कॅशलेस ; डिजिटल वॉलेटमध्ये घेतली एंट्री
जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव ३९.७५ डॉलर प्रती बॅरल आहे. त्यात मंगळवारी १.५ टक्क्याची वाढ झाली. तर ब्रेंट क्रूडचा भाव ४१ डॉलर प्रती बॅरल होता. मार्च महिन्यात कच्च्या तेलाचा भाव शून्याखाली गेला होता. मात्र देशात २५ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी ८३ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते.

केंद्र सरकारला चणचण; ‘पीएफ’वर दर कपातीचे संकट
लॉकडाउन शिथिल होताच पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढवण्यास सुरुवात केली होती. ७ जूनपासून कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावला होता. मागील २३ पैकी २२ दिवस कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले. या दरवाढीने दिल्लीत प्रथमच पेट्रोलच्या तुलनेत डिझेल महाग झाले. डिझेलचा भाव ८० रुपयांवर गेला. तर मुंबईत पेट्रोल ९० रुपयांच्या उंबरठ्यावर पोहचले आहे. सोमवार वगळता मागील चार दिवसात तीन दिवस इंधन दरात कोणतीही वाढ झालेली नाही. यामुळे तूर्त जनतेला दिलासा मिळाला आहे. लॉकडाउनमुळे इंधन विक्रीत प्रचंड घट झाली. १६ मार्च ते ५ मे दरम्यान देशातील पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर होता. य़ा दरम्यान कच्च्या तेलाच्या किंमची वाढत होत्या.हा तोटा भरुन काढण्यासाठी तेल वितरक कंपन्यांनी आता इंधन दर वाढीचा सपाटा लावला आहे. मागील दोन महिन्यांतील नुकसान भरून काढण्यासाठी आणखी काही दिवस पेट्रोल आणि डिझेल महागण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

salon in western railway stations: रेल्वे स्थानकांमध्ये आता सलूनही – western railway has decided to start air-conditioned salon on mumbai central station with six...

म. टा. प्रतिनिधी, मुंबईघड्याळ्याच्या काट्याप्रमाणे धावणाऱ्या मुंबईकरांचा थकवा दूर करण्यासाठी रेल्वे स्थानकांतच काही आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मुंबई सेंट्रलसह सहा...

Recent Comments