Home आपलं जग करियर fyjc admission 2020: अकरावी ऑनलाइन प्रवेशांची नोंदणी १५ जुलैपासून - fyjc admission...

fyjc admission 2020: अकरावी ऑनलाइन प्रवेशांची नोंदणी १५ जुलैपासून – fyjc admission registration for students to start from 15th july


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

लॉकडाउनमुळे दहावीचा निकाल रखडला असला तरी अकरावी प्रवेशाची तयारी आता सुरू झाली आहे. ऑनलाइन होणाऱ्या या प्रवेश प्रक्रियेसाठी १ जुलैपासून कॉलेज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. तर, विद्यार्थ्यांना १५ जुलैपासून नोंदणी करता येणार आहे.

शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाच्या नोंदणीचे संभाव्य वेळापत्रक बुधवारी जाहीर केले. त्यानुसार, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर मुंबईतील कॉलेज १ जुलैला आणि ठाणे, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर महापालिकेतील कॉलेज २ जुलैला वेबसाइटवर नोंदणी करू शकणार आहेत. या कॉलेजांचा तपशील उपसंचालक कार्यालयातून तपासून घेऊन अंतिम करण्यात येणार आहे. या वेबसाइटवर विद्यार्थी १५ जुलैपासून पालकांच्या मदतीने नोंदणी करू शकणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना माहिती मान्यतेसाठी शाळा किंवा मार्गदर्शन केंद्राची निवड करता येणार आहे. तसेच भाग १ भरता येणार आहे. यानंतर १६ जुलैपासून निकाल जाहीर होईपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांचा भाग १ पूर्ण करता येऊ शकेल. तर, भाग २ मध्ये विद्यार्थ्यांना कॉलेजपसंतीक्रम देण्यासाठी दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर झाल्यानंतर संधी मिळणार आहे. यंदा ही प्रक्रिया शाळांमधून न होता विद्यार्थ्यांना पालकांच्या मदतीने पूर्ण करून घ्यावी लागणार आहे. माहिती पुस्तिकाही ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. यानंतरचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे शिक्षण विभागाने कळविले आहे.

अकरावी प्रवेशाच्या वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा…

प्रवेश प्रक्रियेतील बदल

अकरावी प्रवेशासाठी नियमित फेऱ्या पार पडल्यानंतर ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या फेरीचे नियोजन केले जाते. मात्र कमी कालावधीत प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टीने यंदा ही फेरी रद्द करण्यात आली आहे.

UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा उमेदवारांना परीक्षा केंद्र बदलता येणार

आरक्षणातील बदल

– मागील वर्षी सामाजिक, शैक्षणिक मागास प्रवर्गाकरता (एसईबीसी) १६ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. यंदा शासन निर्णयानुसार हे प्रमाण १२ टक्के करण्यात आले आहे.

– अपंग विद्यार्थ्यांसाठी तीन टक्के जागा राखीव होत्या. हे प्रमाण आता चार टक्के करण्यात आले आहे.

CBSE बोर्डाची शाळांना सूचना; ‘या’ विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा

प्रवेश फेऱ्यांचे स्वरूप

– द्विलक्षी अभ्यासक्रमाचे प्रवेश शून्य फेरीत न करता नियमित फेरीत करण्यात येतील.

– नियमित फेऱ्यांनंतर आवश्यकतेनुसार विशेष प्रवेश फेऱ्या होतील.

– विशेष फेऱ्यांतील प्रवेश आरक्षणाऐवजी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार होतील.

– नियमित फेऱ्यांमध्ये पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज मिळूनही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी विशेष फेरीमध्ये सहभागी होऊ शकतील.

एनसीईआरटीत नोकरभरती; २६६ जागा रिक्तSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kamala Harris dance in rain: पाहा: प्रचार सभेत पावसाची हजेरी; कमला हॅरीस थिरकल्या! – us election 2020 kamala harris dances in the rain during...

फ्लोरिडा: अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मतदानासाठी काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. त्यामुळे उमेदवारांकडून प्रचारासाठी जोर लावला जात आहे. प्रचारा दरम्यान काही हलके फुलके क्षणही...

aurangabad News : औरंगाबाद जिल्ह्यात ३४ हजार रुग्ण करोनामुक्त – 34 thousand patient beat coronavirus in aurangabad district

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्ह्यातील सहा बाधितांचा उपचारादरम्यान घाटीसह खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याने एकूण करोनाबळींची संख्या एक हजार ४२ झाली आहे. त्याचवेळी जिल्ह्यात मंगळवारी...

Rishabh Pant Try To Copy MS Dhonis Style Attempt Failed – Video धोनीचा कॉपी प्रयत्न फसला, पंतने करून घेतले हसं; पाहा शिखर धवनचा राग

नवी दिल्ली: IPL 2020आयपीएलच्या १३व्या हंगामात काल मंगळवारी किंग्ज इलेव्हन पंजाबने दिल्ली कॅपिटल्सवर ( kxip vs dc) पाच विकेटनी विजय मिळवला. या विजयामुळे...

Recent Comments