Home विदेश G-7 Invite To Russia, India Targets China Says Russia - भारत, रशियाला...

G-7 Invite To Russia, India Targets China Says Russia – भारत, रशियाला G-7 निमंत्रण चीनविरोधी; ट्रम्प यांना रशियाचं उत्तर


मॉस्को : रशिया स्वतःला आंतरराष्ट्रीय शांततेसाठी एक प्रामाणिक मध्यस्थक म्हणून पाहत आहे. त्यामुळे भारत आणि चीन यांच्यातील लष्करी तणावावर रशिया भाष्य करणार नाही, असं रशियाच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य कोन्सँटिन कोसाचेव यांनी सांगितलं. तर रशिया आणि भारताला मिळालेली जी-७ ची ऑफर ही चीनच्या विरोधात आहे. रशियाला कोणत्याही देशाच्या विरोधी समुहात किंवा गटात जायचं नाही, असंही कोसाचेव यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आपण चीनविरोधी गटात जाणार नसल्याचं रशियाने स्पष्ट केल्याचं चित्र आहे.

एअर स्ट्राइकची चर्चा, कराचीत ब्लॅक आउट!; ट्विटरवर धुरळा

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असलेल्या वादाविषयी रशियाची भूमिका कोसाचेव यांनी स्पष्ट केली. आपण भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर करतो, असं ते म्हणाले. पाश्चिमात्य देशांनी रशियाविरोधी मोहिम चालवल्यामुळे चीनसोबत सध्या सर्वात चांगले संबंध असल्याचंही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत फोनवरुन चर्चा झाल्यानंतर परराष्ट्र सचिव हर्ष श्रिंगला यांनी याबाबत रशियाचे राजदूत निकोलाय कुडाशेव यांना या बैठकीबाबतची माहिती दिली होती. भारत कोणत्याही प्रकारच्या मध्यस्थीविरोधात असल्याचं सांगत ट्रम्प यांची मध्यस्थीची ऑफर नाकारण्यात आली होती

यावर रशियन खासदार म्हणाले, ‘रशिया अशा कोणत्याही प्रकारच्या वादात हस्तक्षेप बिलकुल करणार नाही. पण जेव्हा विविध परिस्थितीमध्ये गरज असेल, तेव्हा आमचा दुतावास शांततेच्या संवादासाठी एक प्रामाणिक मध्यस्थक असेल. पण जिथे सैन्य बळ संबंधित नसेल तिथेच मध्यस्थी केली जाईल.’

भारतीय सैन्य अमेरिका, रशियापेक्षा ‘लय भारी’!; चिनी तज्ञाकडून कौतुक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑस्ट्रेलिया, रशिया आणि भारताला जी-७ मध्ये निमंत्रण दिलं आहे. यावरही रशियाच्या खासदारांनी प्रतिक्रिया दिली. कोसाचेव हे रशियाच्या वरिष्ठ सभागृहातील आंतरराष्ट्रीय विषय समितीचे अध्यक्षही आहेत. भारत आणि रशियाचा दृष्टीकोन वेगवेगळा असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान मोदींना मिळालेलं निमंत्रण भारताने तातडीने स्वीकारलं. पण हे पाऊल चीनला वेगळं पाडण्यासाठी असल्याचं रशियाने म्हटलं.

कोसाचेव यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भारतीय पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘जी-७ समिटमधील निर्णय प्रक्रियेत आपला दबदबा दाखवण्यासाठी रशिया, भारत, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया यांना कोणतीही संधी नाही. कॅनडा आणि ब्रिटन या देशांनीही या चार देशांना दिलेल्या निमंत्रणाचा विरोध केला आहे.’

चीन नव्हे भारतापासून करोना संसर्गाचा धोका; नेपाळचे फुत्कार

‘अनेक असे देश आहेत, जे चर्चेत सहभागी होऊन निर्णय घेण्यासाठी प्रभावी आणि मजबूत स्थितीमध्ये आहेत. चीन हे स्पष्ट उदाहरण आहे. भारत आणि रशियाला निमंत्रण दिलं जातं आणि ते चीनला मिळत नाही याबाबत मला संशय आहे,’ असं कोसाचेव म्हणाले. चीनच्या विरोधात देशांना एकत्र करण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. अमेरिकेचं सध्याचं तेच धोरण आहे. कोणत्याही तिसऱ्या देशाविरोधात आघाडी उघडणे किंवा समूह तयार करणे याला आमचा विरोध असल्याचंही ते म्हणाले.

कोणत्याही देशाचा जी-७ मध्ये समावेश करण्यासाठी ट्रम्प यांच्याकडे बहुमत नाही. ते फक्त पुढील वर्षीच्या समिटचे यजमान आहेत. ते कोणत्याही देशाला निमंत्रण देऊ शकतात. यावरच तर प्रश्नचिन्ह आहे. निमंत्रण दिलेल्या ४ पैकी एकही देश तयारीच्या कामात सहभागी नसेल. तिथे अनेक ठराव आणि कागदपत्र समोर येतील आणि त्यावर सात देशच निर्णय घेणार आहेत, असंही ते म्हणाले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sujay vikhe patil: ‘शरद पवारांवर विश्वास ठेवायचा की मोदींवर? हे जनतेनेच ठरवावे’ – bjp mp sujay vikhe clears stand on k k range issue

अहमदनगर: ‘के के रेंज प्रश्नासंदर्भात आम्ही जी भूमिका तत्कालीन दौऱ्यात मांडली त्यावर आजही ठाम आहोत. त्या भूमिकेत कोणताही बदल नाही. त्यामुळे आता शरद...

Recent Comments