Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल gadget: पावसाळ्यात गॅजेट्सची कशी काळजी घ्याल? - easy ways to keep gadgets...

gadget: पावसाळ्यात गॅजेट्सची कशी काळजी घ्याल? – easy ways to keep gadgets snug and safe this monsoon


जयंत चौगुले

आपण रिमझिम पडणाऱ्या पावसात चिंब भिजण्याचा आनंद घेताना एमपीथ्रीवर गाणी ऐकतो. पण, थोड्या वेळानं लक्षात येतं की आपल्या एमपीथ्रीमध्ये पाणी गेलं आहे. भर पावसात आपण मोबाइल वर बोलत असतो आणि आपल्या नकळत आपल्या मोबाइलमध्ये पाणी जातं. अशा अनेक समस्यांना पावसाळ्यात सामोरं जावं लागतं. वेळीच काळजी घेतली नाही तर आपले गॅजेट्स बंदसुद्धा पडू शकतात. अशा वेळी गॅजेटसची कशी काळजी घ्यावी, याविषयी…

बंद करा

लॅपटॉप, मोबाइल किंवा महागडा कॅमेरा असू दे…पावसात भिजल्यानंतर सर्वात पहिली गोष्ट करा ती म्हणजे तुमचे गॅजेट बंद करा. यामुळे ओलसरपणामुळे होणारं नुकसान टाळता येईल.

कापडावर ठेवा पसरवून

आता गॅजेट उघडून त्यातील भाग सुटे करा. उदाहरणार्थ, मोबाइलमधील मेमरी कार्ड, सीम कार्ड, मागील पॅनल. ते भाग स्वच्छ सुती कापडावर पसरवून ठेवा.

आत गेलेल्या पाण्याचं काय?

गॅजेटच्या वरील भागावर दिसणारं पाणी पुसून काढलं, पण आत गेलेल्या पाण्याचं काय? असा प्रश्न पडणं साहजिक आहे. पण, काळजी करू नका. अशा वेळी भौतिकशास्त्रातील नियमाचा अवलंब करा. जोरजोरात हलवून त्यातील पाणी काढण्याचा प्रयत्न करा. हे सगळं करताना सावधानता बाळगणं गरजेचं आहे.

व्यवस्थित पुसून घ्या

टिश्यू पेपरच्या साहाय्याने गॅजेट काळजीपूर्वक पुसून घ्या. पुसताना गॅजेटच्या आतील खुल्या सर्किट बोर्डला धक्का लागणार नाही याची काळजी घ्या.

ड्रायर वापरावा का?

गरम हवा तुमच्या गॅजेटसाठी चांगली नसते. म्हणून ड्रायरचा वापर टाळावा. त्याऐवजी घरात एसी असल्यास तो ऑन करा आणि त्या थंडागार हवेत गॅजेट थोड्या मिनिटांसाठी ठेवा.

तांदळाचा प्रभावी वापर

वाचायला थोडं विचित्र वाटेल, पण गॅजेटमध्ये गेलेलं पाणी शोषून घेण्यासाठी ते तांदळाच्या डब्यात ठेवणं हा उत्तम पर्याय आहे. एक भांडं घ्या. त्यात स्वच्छ तांदूळ घ्या. आता त्या भांड्यात गॅजेट ठेवा. नंतर भांड्यावर झाकण ठेवा. जेवढं जास्त वेळ तुमचं गॅजेट आत बंद असेल तितकं ते जास्त कोरडं होईल. जास्तीत जास्त एक दिवस गॅजेट भांड्यात बंद करुन ठेवा. जास्त पाणी गेलं असेल तर आणखीन जास्त कालावधीसाठी आत ठेवू शकता. तांदळामधून बाहेर काढताच गॅजेट ऑन करण्याची घाई करू नका. तुमच्याकडे स्पिरीट असल्यास कापसाचा बोळा त्यात बुडवून आतल्या सर्किटवर फिरवून घ्या. यामुळे अतिरिक्त पाण्याचं बाष्पीभवन होईल आणि लवकरात लवकर कोरडं होईल. स्पिरीट नसल्यास गॅजेट्सचे सर्व भाग स्वच्छ मऊ कापडाने पुसून घ्या. ओलसरपणा निघून गेल्याची खात्री होताच सर्व सुटे केलेले भाग पुन्हा जोडा आणि गॅजेट ऑन करा.

टिप्स

– घरातून बाहेर पडताना सोबत सुती कापड ठेवा. प्रवासात गॅजेट्स ओले झाले तर त्या कापडानं स्वच्छ करता येईल.

– बाजारात वायरलेस गॅजेट्स मिळतात. जसं की हेडफोन, चार्जर इत्यादी. त्यातील अनेक गॅजेट्स वॉटरप्रूफसुद्धा आहेत. मान्सून वगळता इतर वेळीसुद्धा ते उपयोगी ठरतात.

– घराबाहेर पडताना गॅजेट्स ठेवण्यासाठी झिप बॅग्स जवळ ठेवा. पारदर्शी आणि वापरायला सोप्या अशा या झिप बॅग्समध्ये गॅजेट्स ठेवा. जेणेकरुन पावसाच्या पाण्यापासून बचाव होईल.

– तुम्ही पावसात पूर्णपणे भिजले असाल आणि तुम्हाला गॅजेट्सचा वापर करायचा असेल तर व्हॉइस असिसटंटचा पर्याय तुमच्याकडे आहे.

– कोणताही ऋतू असू दे एखादं गॅजेट अचानक बंद पडू शकतं. अशा वेळी प्रत्येक गॅजेटचं बॅकअप घेणं गरजेचं आहे. रिमाइंडर लावून वेळोवेळी गॅजेटचं बॅकअप घेत राहा.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments