Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल galaxy note 20 ultra: सॅमसंगचा हा स्मार्टफोन 108MP कॅमेऱ्यासोबत येतोय, जाणून घ्या...

galaxy note 20 ultra: सॅमसंगचा हा स्मार्टफोन 108MP कॅमेऱ्यासोबत येतोय, जाणून घ्या – samsung’s galaxy note 20 ultra smartphone coming with 108mp camera


नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग लवकरच नोट २० स्मार्टफोन सीरिज आणत आहे. या सीरिजचे खास वैशिष्ट्ये म्हणजे गॅलेक्सी नोट २० अल्ट्रा स्मार्टफोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा असणार आहे. या स्मार्टफोनची खूप आधीपासून चर्चा सुरू आहे. परंतु, आता ताज्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. कॅमेरा लेन्स सोडून या फोनमधील बाकीचे फीचर्स नोट २० प्लस यासारखे असतील.

वाचाः जिओचा जबरदस्त प्लान, रोज 3GB डेटा आणि अनलिमिटेड कॉल

S20 सीरिज पुन्हा आणतेय कंपनी
कंपनीने गॅलेक्सी एस २० सीरीजमध्ये कंपनीने असेच केले होते. कंपनीने गॅलेक्सी S20, S20+ आणि S20 Ultra स्मार्टफोन आणले होते. S20 Ultra चे फीचर्स सीरिजच्या बाकीच्या फोनसारखेच होते. परंतु, या फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला होता.

वाचाः अॅपल iPhone 12 चे स्वस्तातील 4G मॉडल आणणार, किंमत जाणून घ्या

असे असतील फीचर्स
यात समोर आलेल्या रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, गॅलेक्सी नोट अल्ट्रा मध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटची LTPO OLED डिस्प्ले असणार आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्लस प्रोसेसर दिला जाणार आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, फोनच्या रियर कॅमेऱ्यात ५० एक्स झूम सोबत पेरिस्कोप कॅमेरा असणार आहे. तसेच यात टेलिफोटो आणि अल्ट्रावाइड कॅमेरा सुद्धा मिळू शकतो.

वाचाः शाओमी ५०० रुपयांत बदलतेय स्मार्टफोनची बॅटरी

कधी आहे लाँचिंग
रिपोर्ट्च्या माहितीनुसार, सीरिजचे अन्य फोनसोबत सॅमसंग गॅलेक्सी नोट २० अल्ट्रा ५ ऑगस्ट रोजी समोर येईल. याशिवाय, कंपनी गॅलेक्सी Z Flip चे ५ जी व्हेरियंट सुद्धा घेऊन येत आहे. तसेच खूप आधीपासून चर्चेत असलेला गॅलेक्सी फोल्ड २ स्मार्टफोन सप्टेंबर महिन्यात लाँच करण्यात येईल.

वाचाः सॅमसंग घेऊन येतेय दोन स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स

वाचाः Paytm चा इशारा, या एका चुकीमुळे रिकामे होईल अकाउंट

वाचाः रियलमीच्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी, किंमत ९ हजारांपेक्षा कमीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Ambernath-Karjat Railway Services: Local Train Latest News: रूळ दुरुस्ती करणारे मशिन घसरले; एक ठार, तीन कामगार जखमी – central railway service disrupted between ambernath...

ठाणे: रेल्वे रूळ दुरुस्त करणारी मशिन रुळावरून घसरून झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे, तर तिघे जखमी झाले आहेत. या अपघातानंतर मध्य...

Sharad Pawar Warns Modi Government After Violence In Delhi – Delhi Violence: ‘पंजाबला पुन्हा अशांत करण्याचं पातक मोदी सरकारनं करू नये’ | Maharashtra Times

मुंबई: शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चादरम्यान राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'बळाचा वापर करून आंदोलन चिरडलं तर...

Recent Comments