Home देश galwan clash: बिहार रेजिमेंटचे जवान चिन्यांचा काळ बनले, १८ जणांच्या माना पिरगळल्या...

galwan clash: बिहार रेजिमेंटचे जवान चिन्यांचा काळ बनले, १८ जणांच्या माना पिरगळल्या – galwan clash indian soldiers battered chinese soldiers


नवी दिल्लीः पूर्व लडाखमध्ये विश्वासघात करून चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर अचानक हल्ला केला. पण देशाच्या सीमेवर तैनात असलेले बिहार रेजिमेंटच्या वीर जवानांमध्ये तुफान संचारलं आणि ते चिन्यांवर तुटून पडले. सोमवारी १५ जूनच्या रात्री झालेल्या हिंसक संघर्षात भारतीय जवानांनी चिन्यांना धडा शिकवला.

गलवानमध्ये १५ जूनला चिन्यांनी धोका देऊन केलेल्या हल्ल्यात भारतीय लष्कराचे कमांडिंग ऑफिरस कर्नल बी. संतोष बाबू शहीद झाले. यामुळे बिहार रेजिमेंटचे जवान तुफान बनून चिन्यांवर तुटून पडले. रौद्र रूप धारण केलेल्या भारतीय जावानांनी एक एक करून १८ चिन्यांच्या माना जागेवरच पिरगळल्या. द एशियन एज या वृत्तपत्राने वेगवेगळ्या सूत्रांच्या माध्यमातून हे वृत्त दिलंय. भारतीय जवानांच्या कारवाईत १८ चिनी सैनिकां मानेचे हाडं तुटली होती आणि मुंडकी हलत होती, अशी माहिती लष्कराच्या एका अधिकाऱ्याने दिली. कमांडर शहीद झाल्याचे पाहून जवानांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला होता. समोर येणाऱ्या चिनी सैनिकांचे असेल हाल केले की त्यांना ओळखनंही कठीण झालं, असं अधिकारी म्हणाला.

जवान १ आणि ५ चिनी सैनिक, तरीही धडा शिकवला

बिहार रेजिमेंटच्या जवानांनी त्या रात्री चिन्यांना असा धडा शिकवला की त्यांच्या शौर्याची गाथा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरेल. त्या रात्री चिनी सैनिकांची संख्या भारतीय जवानांच्या तुलनेत ४ पटीने अधिक होती. एवढचं नाही तर चिनी सैनिकांनी कट रचून हा हल्ला केला होता. त्यावेळी भारतीय जवानांची कुठलीही तयारी नव्हती. कारण चिनी असा धोका देतील असं त्यांना कधी वाटलं नाही. तरीही जवानांनी चिन्यांना असा धडा शिकवला की चीन सरकार यावर बोलायलाही तयार नाहीए.

ती रात्र जवानांच्या शौर्याची साक्षीदार

बिहार रेजिमेंटच्या जवानांनी आपल्यातील सर्व शक्ती पणाला लावली. भारतीय जवान चिन्यांवर काळ बनून तुटून पडले. गलवानमध्ये चिनी सैनिकांनी बांधलेले तंबू हटवण्याचे आदेश मिळाले होते. त्यानुसार कर्नल बी. संतोष बाबू हे घटनास्थळी पोहोचले. चिनी सैनिकांना त्यांनी तंबू हटवण्यास सांगितलं. पण मोठ्या संख्येने जमा झालेल्या चिन्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर भारतीय जवानांनी चिन्यांना फैलावर घेत एकेकाला उत्तर दिलं.

लष्कराचे घातक पथक मदतीला धावले

हिंसक संघर्षात बी. संतोष बाबू शहीद झाल्यानंतर बिहार रेजिमेंटच्या जवानांचा संयम सुटला. चिनी सैनिकांची संख्या अधिक होती. यामुळे जवळ असलेल्या लष्कराच्या दुसऱ्या तुकडीला याची माहिती दिली आणि मदत मागितली. माहिती मिळताच लष्कराचे ‘घातक पथक’ ( ambush team ) तिथे दाखल झालं. बिहार रेजिमेंटचे जवान आणि घातक पथकातील जवानांची संख्या मिळून फक्त ६० होती. दुसरीकडे चिनी मोठ्या संख्येत होते.

चिन्यांच्या शस्त्रांनी चिन्यांवरच वार

गलवान खोऱ्यात चार तास भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक धुमश्चक्री सुरू होती. चिन्यांकडे तलवारी आणि लोखंडी रॉड होते. भारतीय जवानांनी ती हिसकावून त्यांच्यावरच वार करण्यास सुरुवात केली. बिहार रेजिमेंटच्या जवानांचा आक्रोश पाहून शेकडोंच्या संख्येत असलेले चिनी सैनिक पळू लागले आणि खोऱ्यात लपून बसले. यानंतर भारतीय जवानांनी त्यांना पकडून पकडून मारले. यादरम्यान भारतीय जवान चीनच्या सीमाभागात दाखल झाले होते. त्या जवानांना चीनने नंतर सोडलं.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

it raid: anurag kashyap : अनुराग कश्यप, तापसी पन्नूसह इतरांनी कोट्यवधींची संपत्ती दडवली! – it raid on two production houses anurag kashyap and taapsee...

नवी दिल्लीः दिग्दर्शक अनुराग कश्यप ( anurag kashyap ), अभिनेत्री तापसी पन्नू ( taapsee pannu ) आणि इतर काही जणांच्या ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने...

Recent Comments