कर्नाल संतोष बाबू यांच्या कुटुंबीयांना पाच कोटींची मदत घोषित करण्यात येत आहे. तसंच राहण्यासाठी एक प्लॉट आणि त्यांच्या पत्नीला नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आलंय. शहीद झालेल्या इतर १९ जवानांचाही तेलंगण सरकारकडून मरणोत्तर सन्मान करण्यात येणार आहे. या जवानांच्या कुटुंबीयांना तेलंगण सरकार प्रत्येकी १० लाखांची मदत देणार आहे.
पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये चिनी सैनिकांच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले. यात चीनचे कमीत कमी ४३ सैनिक मारले गेल्याचं सांगण्यात येतंय. गलवान सुरू असलेल्या सततच्या तणावामुळे कर्नल संतोष बाबू हे चर्चा करण्यासाठी गेले होते. तिथून परत असताना चिनी सैनिकांनी विश्वासघात करत त्यांच्यावर हल्ला केला. यानंतर दोन्ही बाजूंच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष सुरू झाला.
चीनवर होऊ शकते मोठी कारवाई? राम माधव यांनी दिले संकेत
एक इंच जमीनही बळकावण्याची हिंमत करू नका, PM मोदींचा चीनला इशारा
लडाखमधील स्थिती नियंत्रणात
दरम्यान, लष्कराच्या १४ कॉर्प्सकडे लडाखची जबाबदारी आहे. सध्या तिथली स्थिती नियंत्रणात आहे आणि जी काही आवश्यक गोष्टी आहेत त्या लष्कराकडून पूर्ण केल्या जात आहेत. लडाखमध्ये तैनात असलेले १४ कॉर्प्सचे जवान कुठल्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम आहेत, अशी माहिती १५ कॉर्प्सचे जीओसी लेफ्टनंट जनरल बगावली सोमशेखर राजू यांनी दिली.