Home महाराष्ट्र gang rape: विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी - 17...

gang rape: विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी – 17 year old girl allegedly gang raped by friends in nagpur


म.टा. प्रतिनिधी, नागपूरः एका विद्यार्थिनीवर अत्याचार करून त्याचा व्हिडीओ तयार करणाऱ्या व तो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या दोघांवर आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या एका मुलीवर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणातील १७ वर्षीय पीडित मुलगी ही इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी आहे. तिच्या वस्तीत राहणारा अल्पवयीन मुलगा अमोलशी (नाव बदलेले) तिची ओळख झाली. या ओळखीचे रुपांतरण पुढे प्रेमसंबंधात झाले. पीडितेच्या तक्रारीनुसार सामुहिक अत्याचाराची घटना ९ मार्च रोजी घडली. पीडित मुलगी ट्युशनहून घरी परत येत असताना अमोलने तिला थांबविले व बळजबरीने आपल्यासोबत आपला मित्र रोहितच्या घरी नेले. यावेळी रोहितच्या घरी रोहितसोबत त्याची एक मैत्रीणही उपस्थित होती. अमोल आणि रोहित यांनी पीडित मुलीवर आळीपाळीने अत्याचार केला व रोहितच्या मैत्रिणीने याचा व्हिडीओ तयार केला. या दोघांनी तिला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि सातत्याने शरीरसुखाची मागणी करू लागले. अखेर पीडितेन ही बाब कुटुंबीयांना सांगितली आणि या प्रकरणी पोलिसात तक्रार केली. या मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

PM Modi: PM मोदींचा जागतिक पुरस्काराने सन्मान; म्हणाले, ‘भारतीय जनतेला…’ – pm modi conferred with the ‘global energy and environment leadership award’

नवी दिल्लीः ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचे अनेक आघाड्यांवरील अभियानन आणि जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पंतप्रधान मोदी यांना शुक्रवारी सेरावीक ग्लोबल एनर्जी...

Recent Comments