पालघरच्या प्रकरणाचा निषेध गंभीरने केला आहे. या प्रकरणाबाबत गंभीरने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये गंभीरेने लिहीले आहे की, ” सध्याच्या घडीला माणसामध्ये प्राणी पाहायला मिळत आहे. माणसाची कातडी वावरून प्राणी वावरत असल्याचे दिसत आहे. पालघर येथे अमानुष प्रकार घडला. हा प्रकार निंदनीय होता. पालघर येथील लोकांनी तीन जणांचा जीव घेतला आणि त्यांनी ७० वर्षांच्या व्यक्तीची विनवणीही ऐकली नाही, अशा लोकांची मला लाज वाटते.”
The most inhuman, barbaric & reprehensible act by animals walking around in human skinThey took three lives & didn… https://t.co/CA5Ua29IS3
— Gautam Gambhir (@GautamGambhir) 1587318979000
पालघर येथील मॉब लिंचिंगची घटना ही दोन धर्मांमधला संघर्ष नाही. त्यामुळे याला धार्मिक रंग देऊन आग लावण्याचं काम करू नका. या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचाही प्रयत्न करू नका, असा इशारा देतानाच पालघर घटनेतील ११० हल्लेखोरांना त्याच दिवशी अटक केली असून कुणालाही सोडलं जाणार नाही. या हल्लेखोरांना कठोर शिक्षा केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
पालघर मॉब लिंचिंग प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असं सांगतानाच महाराष्ट्रात मॉब लिंचिंग सारख्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून हा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालघरच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. साधूंवर हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली असल्याचं मी सर्व राजकीय पक्षांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. या गुन्हेगारांना कठोर शिक्षा दिली जाईल. महाराष्ट्र सरकार अशा प्रकारच्या घटना खपवून घेणार नाही, असं आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.