Home क्रीडा Gautam Gambhir: सचिनचा प्रस्ताव ट्वेन्टी-२०मध्ये आणू नये, गौतम झाला गंभीर... - gautam...

Gautam Gambhir: सचिनचा प्रस्ताव ट्वेन्टी-२०मध्ये आणू नये, गौतम झाला गंभीर… – gautam gambhir is against splitting t-20 cricket into four innings


भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने काही दिवसांपूर्वी एक प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आणू नये, असे मत भारताचा माजी सलामीवीर आणि भाजपाचा खासदार गौतम गंभीरने व्यक्त केले आहे.

काही दिवसांपूर्वी सचिनने क्रिकेटबाबत एक प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावामध्ये खेळ अधिक कसा रंचक करता येईल, हे सचिनने सांगितले होते. पण या प्रस्तावाला आता गंभीरने विरोध केला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली यानेही हा प्रस्ताव नाकारला आहे. या प्रस्तावावर गंभीर आण ब्रेट यांचे काय म्हणणे आहे ते जाणून घेऊया…

सचिनने काय प्रस्ताव ठेवला होता…

sachin tendulkar

सध्याच्या घडीला ट्वेन्टी-२० क्रिकेटमुळे एकदिवसीय क्रिकेट जास्त पाहिले जात नाही. त्यासाठी सचिनने एक प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावामध्ये सचिनने म्हटले होते की, एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रत्येक संघ ५० षटके फलंदाजी करतो. ही ५० षटके त्यांना सलग फलंदाजी करायला देऊ नये. यासाठी २५-२५ षटकांचे दोन डाव खेळडवले जावेत, जेणेकरून एकदिवसीय क्रिकेट अधिक रंजक करता येईल.

सचिनच्या प्रस्तावावर गंभीर काय म्हणाला…
सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५-२५ षटकांचे दोन डाव प्रत्येक संघाला खेळण्यासाठी द्यावेत, असा प्रस्ताव ठेवला होता. पण हा प्रस्ताव ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आणता कामा नये. कारण हा प्रस्ताव जर ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आणला तर खेळाची लांबी अजूनकमी होईल. जर प्रत्येक संघाला १०-१० संघांचे दोन डाव खेळण्यासाठी दिले तर त्याचा काही फायदा होणार नाही. त्यामुळे सचिनचा प्रस्ताव हा ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आणू नये.

ब्रेट ली काय म्हणाला…

maharashtra times

brett

याबाबत ब्रेट लीही म्हणाला की, ” सचिनचा प्रस्ताव जर ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आणला तर ते योग्य ठरणार नाही. कारण या क्रिकेटच्या प्रकाराची लांबी कमीच आहे. त्यामुळे जर १०-१० षटकांचे दोन डाव खेळवले गेले तर नक्कीच खेळातील रोमांच कमी होऊ शकतो. त्यामुळे या प्रस्तावाचा अमंल ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये करू नये, असे मला वाटते.”Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Laxman Gaikwad: ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांचा उदरनिर्वाहासाठी लढा – marathi author laxman gaikwad started fast against maha vikas aghadi government

म. टा. विशेष प्रतिनिधी, गोरेगावगोरेगावच्या चित्रनगरीमध्ये १९९४पासून 'उचल्या'कार लक्ष्मण गायकवाड यांनी उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने दिलेल्या जागेवर उपाहारगृह सुरू केले आहे. या जागेचे भाडे...

lord arjuna promise: आस्वाद – dr namdev shastri article on lord arjuna promise and taste

न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्रीसत्य जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत मनुष्यात संशय असतो. आपल्यात संशय आहे, याचा आपल्यालाच संशय येत नसतो, तरीदेखील तो असतो. याचं...

Recent Comments