Home देश general Manoj Mukund Naravane: पाकिस्तानला सणसणीत प्रत्युत्तर देणार, लष्कर प्रमुखांचा इशारा -...

general Manoj Mukund Naravane: पाकिस्तानला सणसणीत प्रत्युत्तर देणार, लष्कर प्रमुखांचा इशारा – indian army chief gen mm naravane warns pakistan after handwara encounter


नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामधील चकमकीच्या घटनेनंतर भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांनी पाकिस्तानला आज थेट इशारा दिला आहे. पाकिस्तानने सीमेवर चिथावणीखोर गोळीबार आणि दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे धोरण सोडले नाही तर सणसणीत प्रत्युत्तर दिले जाईल, असं नरवणे यांनी म्हटलंय. करोना संकटाचा सामना करण्याऐवजी दहशतवाद्यांची घुसखोरी वाढवण्याकडे पाकिस्तानचे अधिक लक्ष आहे, असं नरवणे म्हणाले. गेल्या शनिवारी हंदवाडमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे ५ जवान शहीद झाले होते.

नियंत्रण रेषेवर (LoC) पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. चिथावणीखोर गोळीबार केला जात आहे. भारतात दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या एकमेव अजेंड्यावर पाकिस्तानचे अजूनही काम सुरू आहे. पाकिस्तान हा संपूर्ण जगासाठी एक संकट बनला, असं नरवणे म्हणाले. दहशतवादाला पाठिंबा देण्याचे धोरण पाकिस्तान सोडत नाही तोपर्यंत त्याला भारताकडून सणसणीत प्रत्युत्तर मिळत राहील. शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सीमेवर पाकडून होत असलेल्या गोळीबाराला आणि दहशतवाद्यांच्या घुसखोरीला भारताकडून सडेतोड उत्तर मिळेलच, असा इशारा नरवणे यांनी दिला.

हंदडवाडामधील चकमकीत ५ जवान शहीद झाले. या चकमकीत निष्पाप नागरिकांचा मृत्यू होऊ नये याची पूरेपूर काळजी शहीद कर्नल आशुतोष शर्मा यांनी घेतली. त्यांनी दहशतवाद्यांविरोधातील मोहीमेचे नेतृत्व करत नागरिकांसाठी प्राणांची आहुती दिली. लष्कराचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीसांचे हे शौर्या अतुलनिय आहे, असं म्हणत लष्कर प्रमुख नरवणे यांनी शहीदांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

कुलभूषण यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानशी गुप्त चर्चा

हंदवाडा चकमकीत लष्कर ए तोयबाच्या ‘हैदर’ला कंठस्नान

काश्मिरींचा मित्र असल्याचं पाकिस्तानकडून सांगण्यात येतं. पण पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडून काश्मिरी नागरिकांच्या हत्या होत आहेत. तसंच दहशतवाद पसरवत आहे. काश्मिरी नागरिकांचा हा कसा मित्र आहे. काश्मीरला स्वातंत्र्य देण्याच्या नावाखाली पाक दहशतवाद पसरवत आहेत. फक्त भारतातच नाही तर अफगाणिस्तानमध्येही पाककडून दहशतवाद पसरवला जात आहे. दहशतवाद्यांच्या यादीतून पाकिस्तानने अनेकांची नावं हटवल्यानं हे स्पष्ट होतं, असं लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणी यांनी स्पष्ट केलं.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

petrol rate hike: पेट्रोल-डिझेल महागले; तीन दिवसांनंतर पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा झटका – petrol diesel rate hike today after three day pause

हायलाइट्स:पेट्रोलियम कंपन्यांनी आज शनिवारी पुन्हा इंधन दरवाढ केली.याआधी सलग तीन दिवस इंधन दर स्थिर ठेवले होते.आज पेट्रोल २४ पैसे आणि डिझेल १७...

Sanjay Raut Praises Uddhav Thackeray: ‘उद्धव ठाकरे हे मिस्टर सत्यवादी; कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत’ – uddhav thackeray is mr. satyawadi, says shiv sena...

मुंबई: 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मिस्टर सत्यवादी आहेत. अत्यंत जागरूक व न्यायप्रिय आहेत. ते कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत,' असा दावा शिवसेनेचे...

nashik corona update: Coronavirus : नाशिक जिल्ह्यात ३२४ नवे रुग्ण; तिघांचा मृत्यू – nashik reported 324 new corona cases and 3 deaths in yesterday

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकजिल्ह्यात करोना संशयितांची संख्याही वाढत असून, तब्बल १,२४८ अहवाल प्रलंबित म्हणजेच रांगेत आहेत. शुक्रवारी ३२४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले...

Recent Comments