Home देश ghanti bajao campaign: महिलांचे नवे अभियान; घरोघरी जाऊन वाजवतात घंटी - ghanti...

ghanti bajao campaign: महिलांचे नवे अभियान; घरोघरी जाऊन वाजवतात घंटी – ghanti bajao campaign women in lucknow started campaign against dengue in faizullaganj during coronavirus


लखनऊ: भारतासह संपूर्ण जगात करोनाचा कहर सुरू झाला आहे. जगभरात लाखो लोक या साथीच्या आजाराचे बळी ठरले आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथेही करोनाचा कहर सुरू असून येथे हा साथीचा आजार नियंत्रणात येण्याचे नाव घेत नाही. या विषाणूशी लढा देत असताना या पावसाळ्याच्या काळात डेंग्यूचा उद्रेक होऊ नये यासाठी लखनऊमध्ये महिलांना विशेष मोहीम सुरू केली आहे. लखनऊच्या फैजुल्लागंज या परिसरात या महिलांनी ‘घंटी बजाओ अभियान’ सुरू केले आहे. या अभियानांतर्गत या महिला घरोघरी जाऊन घंटी वाजवतात आणि डेंग्यू या आजाराप्रती जनजागृती करतात. गेल्या वर्षी मडिगाव पोलिस ठाणे क्षेत्रातील फैजुल्लांज येथे डेंग्यूचा उद्रेक झाला होता. डेंग्यूमुळे येथे अनेकांचे बळी गेले आहेत.

लखनऊच्या फैजुल्लागंज येथील सामाजिक कार्यकर्त्या ममता त्रिपाठी यांच्या नेतृत्वात येथे लोकांनी डेंग्यूच्या विरोधात जागृतीची लढाई सुरू केली आहे. गेल्या वर्षी फैजुल्लागंजमध्ये डेंग्यूसारख्या घातक आजाराने अनेक लोकांचे बळी गेले आहे, असे बाल महिला सेवा संघटनेच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या ममता त्रिपाठी यांनी म्हटले आहे. या वर्षी या भागात करोनाचा कहर झाला आहे. आता पावसाळा सुरू झाला असून या करोनासोबतच डेंग्यूची साथ पसरण्याचा धोका आहे. हे पाहता लखनऊतील फैजुल्लागंज हा भाग दुहेरी संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असा परिस्थितीवर जनजागृतीच्या माध्यमातून मात करता येऊ शकते आणि साथीच्या आजारांना रोखण्यासाठी प्रशासकीय प्रयत्नांबरोबरच जनजागृतीचा प्रभाव फार उपयुक्त ठरू शकतो. म्हणूनच ममता त्रिपाठी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घंटी वाजवा अभियान सुरू केले आहे.

वाचा: करोना Live: देशातील एकूण रुग्णांची संख्या पोहोचली ५,२८,८५९ वर
जनजागृती अभियानामध्ये करोनाचाही विचार

या वर्षी अगोदरपासूनच लोकांना संसर्गजन्य आजारांपासून वाचवण्यासाठी सतत १०० दिवस डेंग्यूच्या विरोधात घंटी वाजवा अभियान चालवले जाईल, असे ममता यांनी सांगितले. या अभियानांतर्गत संघटनेच्या कार्यकर्त्या घरोघरी जाऊन जागृतीसाठी पत्रकेही वाटत आहेत. करोनाचे संकट पाहता सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत संघटनेचे सर्व कार्यकर्ते शारीरिक अंतराचे देखील भान राखत असल्याचे ममता म्हणाल्या.

वाचा: दिल्ली सरकारने घाबरवले, सामूहिक संसर्ग नाहीः अमित शहा

वाचा:करोनाचा समूह संसर्ग सुरू , पहिल्यांदाच एका मुख्यमंत्र्यांनी केलं मान्यSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Ramchandra Guha Criticize N. Srinivasan And Sourav Ganguli’s Role In Indian Cricket – अमित शहा यांच्याबरोबर कोण चालवंतय बीसीसीआय, रामचंद्र गुहा यांनी केला गंभीर...

मुंबई : राजकारण आणि क्रिकेट यांचा संबंध फार वर्षांपासून येत आला आहे. पण सध्याच्या घडीला भारताचे गृह मंत्री अमित शहा हे बीसीसीआय चालवत...

Katrina Kaif Covid-19 Test Before Shoot Watch Video – कतरिना कैफने शेअर केली तिची करोना टेस्ट, लवकर सुरू करणार शूटिंग

मुंबई- करोना व्हायरसचा वाढा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सुरुवातीच्या काळात जगभरात लॉकडाउन करण्यात आलं. सिनेसृष्टीतही यातून सुटली नाही. अनेक निर्बंधासह शूटिंगचं काम तातडीने बंद...

Recent Comments