Home देश पैसा पैसा gold cross 50000 in jalgaon maharashtra: सुवर्ण झळाळी; सोन्याने ओलांडला ५० हजाराचा...

gold cross 50000 in jalgaon maharashtra: सुवर्ण झळाळी; सोन्याने ओलांडला ५० हजाराचा टप्पा – gold rate in jalgaon crossed 50000 per ten gram


म. टा. प्रतिनिधी, जळगाव : जळगावात गुरुवारी सोन्याच्या भावाने ५० हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. सकाळी सराफ बाजार उघडल्यानतंर सोन्याचा भाव ४९ हजार २०० तर जीएसटीसह ५१ हजार ५०० रुपयांवर पोहचला होता. आठवडाभरात सोन्याचे दोन हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता देखील सराफ व्यावसायिकांनी वर्तवली आहे.

कमोडिटी मार्केटमध्ये असलेले उच्चांकी भाव आता प्रत्यक्ष बाजार सुरू झाल्यानंतरही कायम आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिली तर सोन्याचे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे. लग्नसराई देखील काही प्रमाणात सुरू झाल्याने सोने चांदी खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. सोन्याचे भाव सातत्याने वाढत असल्याने गुंतवणूकदार देखील खरेदीकडे वळले आहेत.

वाचा : विमादावा प्रक्रियेत गोंधळला आहात; या गोष्टी जाणून घ्या
आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉलरचे दर स्थिर असले तरी भारत-चीन, चीन-अमेरिका यांच्यातील तणाव, कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम या साऱ्या बाबींमुळे सोने-चांदीचे भाव वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्थव्यवस्थेत असलेली अस्थिरता देखील सोन्याचे भाव वाढण्यास कारणीभूत असल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे. चांदीची तेजी देखील कायम आहे. गुरुवारी जळगावात चांदीचे भाव प्रतिकिलो ५१ हजार ५०० रुपये असे होते.

केंद्र सरकारचा दिलासा ; अल्पबचत व्याजदर ‘जैसे थे’
goodreturns.in या वेबसाईटनुसार आज गुरुवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७६५० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ४८६५० रुपये झाला आहे. त्यात बुधवारच्या तुलनेत ३०० रुपये वाढ झाली. दिल्लीत २२ कॅरेट सोनं ४७५६० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ४८७६० रुपये आहे. दिल्लीत सोने ४६० रुपयांनी महागले आहे. कोलकात्यात २२ कॅरेटचा भाव ४७९७० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ४९२४० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६७४० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ५०९५० रुपये झाला आहे.

इंधन दरवाढीला लगाम; सलग तिसऱ्या दिवशी किंमती ‘जैसे थे’
कमॉडिटी बाजारात बुधवारी सोन्यामध्ये तेजी दिसून आली. सकाळच्या सत्रात सोने वधारले होते. मात्र त्यानंतर झालेल्या नफावसुलीने सोन्यातील तेजीला ब्रेक लावला. दिवसअखेर सोने २६७ रुपयांनी स्वस्त झाले आणि ४८४९५ रुपयांवर बंद झाले. चांदीला देखील नफेखोरीची झळ बसली. बाजार बंद होताना चांदीचा भाव २१९ रुपयांनी घसरून ५०१४५ रुपयांवर बंद झाला. त्याआधी कालच्या दिवसभरात चांदीचा भाव ५०८९१ रुपयांच्या उच्चांकी स्तरावर गेला होता.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments