Home देश पैसा पैसा gold price today: कमॉडिटी बाजारात नफावसुली ; सोन्याचा भाव घसरला

gold price today: कमॉडिटी बाजारात नफावसुली ; सोन्याचा भाव घसरला


मुंबई : आज सकाळी MCX वर सोन्याचा दरात ०.३७ टक्क्यांची घसरण झाली. सध्या बाजारात सोने १० ग्रॅमला १७३ रुपयांनी स्वस्त झाले असून ते ४६३८५ रुपयांवर ट्रेड करत आहे. चांदीचा भाव देखील २८० रुपयांनी कमी झाला आहे. चांदीचा दर प्रती किलो ४८७०० रुपये आहे. मुंबईत सोने १२० रुपयांनी स्वस्त झाले. २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५९५० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्यासाठी ४६९५० रुपये दर आहे. चांदीचा भाव किलोला ५१०६० रुपये आहे. दिल्लीत सोन्याचा भाव २२ कॅरेट साठी ४५९५० आणि २४ कॅरेटसाठी ४७१५० रुपये आहे.

‘गोल्ड ईटीएफ’ना वाढती पसंती; एप्रिलमध्ये ७३१ कोटींची गुंतवणूक
करोना रोखण्यासाठी देशात पाचवा लॉकडाउन सुरु आहे. मात्र अनलॉक-१ च्या माध्यमातून लॉकडाउन टप्प्याटप्याने शिथिल करण्यात येणार आहे. दरम्यान, मंगळवारपासून राजधानी दिल्लीतील सराफा बाजार खुले झाले.

जागतिक कमॉडिटी बाजारात आज सोन्याचा भाव प्रती औंस १७२२.९३ डॉलर होता. त्यात ०.२ टक्क्याची घसरण झाली. चांदीचा भाव ०.६ टक्क्याने कमी होऊन १७.९८ डॉलर प्रती औंस राहिला. उद्या गुरुवारी युरोपियन सेंट्रल बँकेच्या संचालकांची बैठक होणार आहे. त्यात बँकेकडून किमान ५०० अब्ज युरोचे आर्थिक पॅकेज घोषीत केले जाईल, असा अंदाज कमॉडिटी विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

आर्थिक चणचण दूर करण्यासाठी अनेकांनी पदरचे सोनं गहाण ठेवून कर्ज काढण्याचा पर्याय निवडला आहे. हा ट्रेंड पाहून बँक आणि वित्त संस्थानी गोल्ड लोनचे विविध पर्याय बाजारात सादर केले आहेत. बाजारात गोल्ड लोन योजना उदंड झाल्या आहेत.सोने खरेदीमध्ये भारत हा जगातील मोठ्या ग्राहक देशांपैकी एक आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अंदाजानुसार भारतीयांकडे २२००० ते २५००० टन सोने आहे. त्यापैकी ६५ टक्के सोने हे ग्रामीण भारतात आहे. या अवाढव्य सोन्यापैकी केवळ १.२ टक्के सोने गहाण ठेवण्यात आले आहे. त्यामुळे गोल्ड लोन व्यवसायात प्रचंड संधी असल्याचे जाणाकरांचे म्हणणे आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Aurangabad Municipal Corporation: ‘करोना’शी लढताना पालिकांना आर्थिक चिंता – municipal corporation has need government fund to fight with coronavirus

औरंगाबाद: करोना संसर्गाशी दोन हात करताना महापालिकांना शासनाच्या निधीची गरज आहे, पण राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने निधी देताना हात आखडता घेतला आहे....

Maharashtra cabinet: केंद्राच्या ‘दूजाभावा’वर मंत्रिमंडळाची नाराजी – maharashtra cabinet upset on central government’s financial helps

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकेंद्र सरकार आर्थिक मदत करीत नसल्यामुळे राज्य सरकारची कोंडी होत असल्याची तक्रार करीत, मंगळवारच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा...

Recent Comments