Home देश पैसा पैसा gold price today: सोने-चांदी वधारले ; जाणून घ्या आजचा भाव - gold...

gold price today: सोने-चांदी वधारले ; जाणून घ्या आजचा भाव – gold price in mumbai surge


मुंबई : स्थानिक कमॉडिटी बाजारात मंगळवारी झालेल्या नफावसुलीनंतर आज सोने आणि चांदीच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार आज सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४८५५९ रुपये झाला. त्यात २५ रुपयांची वाढ झाली. तर चांदीमध्ये ४४ रुपयांची वाढ झाली असून चांदीचा भाव प्रती किलो ४८६०० रुपये झाला.

कमॉडिटी बाजारात मंगळवारी सोन्याच्या किमती ४८८२५ रुपयांच्या विक्रमी स्तरावर गेल्या होत्या. मात्र त्यात नंतर जोरदार नफा वसुली झाली. काल सोने २५० रुपयांनी स्वस्त झाले.कमॉडिटी बाजारात याआधी ४८२८९ रुपयांचा सार्वकालीन उच्चांकी दर होता. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार मंगळवारी दिल्लीत सोने ११९ रुपयांनी महागले. सोन्याचा भाव ४९३०६ रुपयांवर गेला. चांदी १४०८ रुपयांनी वधारले असून चांदीचा दर ४८०७५ रुपये झाला आहे.

शेअर बाजार ; ‘निफ्टी’साठी १०३०० अंकांचा स्तर निर्णायक
goodreturns.in या वेबसाईटनुसार आज बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७३५० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ४८३५० रुपये झाला आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोनं ४७१०० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ४८३०० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेटचा भाव ४७६७० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ४८९४० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६२७० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ५०४८० रुपये झाला आहे.

या कंपन्यांकडून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नोकरभरती
जागतिक बाजारात मंगळवारी स्पॉट गोल्ड (SpotGold) १७७३ डॉलर प्रती औंसवर ट्रेड करत आहे. चांदीचा भाव १७.८६ डॉलर प्रती औंस आहे. आर्थिक पॅकेजच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत चालू वर्षात १६ टक्के वाढ झाली आहे.

वाचा :विमादावा प्रक्रियेत गोंधळला आहात; या गोष्टी जाणून घ्या
करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने बड्या देशांमधील केंद्रीय बँकांनी अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आर्थिक पॅकेजची तयारी सुरु केली आहे. परिणामी भांडवली बाजारातील संस्थात्मक गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांनी गुंतवणुकीची स्ट्रॅटेजी बदलली आहे. संस्थात्मक गुंतवणूकदार मौल्यवान धातूला गुंतवणुकीसाठी पसंत करत आहेत. महागाई आणि चलनातील अवमूल्यनाला हेजिंगचा भक्कम पर्याय म्हणूनदेखील सोने गुंतवणूकदारांना वरदान ठरत आहे.

‘वस्तूवर संबंधित देशाचं नाव छापणं अनिवार्य करा’
सोने खरेदीमध्ये भारत हा जगातील मोठ्या ग्राहक देशांपैकी एक आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अंदाजानुसार भारतीयांकडे २२००० ते २५००० टन सोने आहे. त्यापैकी ६५ टक्के सोने हे ग्रामीण भारतात आहे. या अवाढव्य सोन्यापैकी केवळ १.२ टक्के सोने गहाण ठेवण्यात आले आहे. त्यामुळे गोल्ड लोन व्यवसायात प्रचंड संधी असल्याचे जाणाकरांचे म्हणणे आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

rbi vacancy 2021: दहावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी; RBI मध्ये भरती – rbi vacancy 2021 recruitment for security guard posts in reserve bank of...

RBI Recruitment 2021: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) सुरक्षा रक्षक पदांसाठी (security guard) भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या उमेदवारांना...

LIVE : शरद पवार यांनी केली सिरम संस्थेची पाहणी | News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जयंती बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाब्यात पूर्णाकृती पुतळ्याचा सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण सोहळ्याला शरद पवार राहणार उपस्थित फडणवीस, राज ठाकरेही राहणार उपस्थित Source link

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

म. टा. वृत्तसेवा, सटाणा मागील काही वर्षात शेतात सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने तळवाडे दिगर येथील शेतकऱ्याने शुक्रवारी (दि.२२) आपल्या शेतातील...

Bharat Arun: चौथी कसोटी जिंकण्यासाठी भारतीय संघाने घेतली होती मोठी रिस्क – aus vs ind indian cricket team bowling coach bharat arun reaction on...

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाने घेतलेल्या एका धाडसी निर्णयामुळे विजय मिळाल्याचे संघाचे गोलंदाजीचे कोच भरत अरुण ( bharat arun) यांनी सांगितले....

Recent Comments