Home देश पैसा पैसा gold price today: सोने महागले ; जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव -...

gold price today: सोने महागले ; जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव – Gold Price Inches Up In Commodity Exchange


मुंबई : आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) सोन्याचा दरात ०.२५ टक्क्यांची वाढ झाली. सोने १० ग्रॅमला ११६ रुपयांनी महाग झाले असून भाव ४६१२४ रुपयांवर गेला आहे. चांदीचा भाव मात्र ९ रुपयांनी कमी झाला. चांदीचा दर प्रती किलो ४८४४५ रुपये आहे.

म्युच्युअल फंड गुंतवणुकीत नुकसान; ‘SIP’बाबत तज्ज्ञांचा हा सल्ला
इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) आज मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४२५४० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्यासाठी ४६४४१ रुपये दर आहे. चांदीचा भाव किलोला ४७६४० रुपये आहे. करोना रोखण्यासाठी देशात पाचवा लॉकडाउन सुरु आहे. मात्र अनलॉक-१ च्या माध्यमातून लॉकडाउन टप्प्याटप्याने शिथिल करण्यात येणार आहे. दरम्यान, दीर्घकालीन लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान झाल्याची टीका आता उद्योजकांकडून केली जात आहे.

जागतिक कमॉडिटी बाजारात आज सोन्याचा भाव प्रती औंस १७०३.६७ डॉलरवर गेला आहे. त्यात ०.४ टक्क्याची वाढ झाली. चांदीचा भाव ०.४ टक्क्याने कमी होऊन १७.५९ डॉलर प्रती औंस राहिला. आज गुरुवारी युरोपियन सेंट्रल बँकेच्या संचालकांची बैठक होणार आहे. त्यात बँकेकडून किमान ५०० अब्ज युरोचे आर्थिक पॅकेज घोषीत केले जाईल, असा अंदाज कमॉडिटी विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सोने चांदीवर परिमाण होण्याची शक्यता आहे. जगातील सर्वात मोठा गोल्ड ईटीएफ असलेल्या SPDR Gold Trust चा सोन्याचा साठा ०.४ टक्क्यांनी वाढून ११३३.३७ टनांपर्यंत वाढला आहे.
आर्थिक चणचण ; बाजारात ‘गोल्ड लोन’चा सुकाळ
गेल्या वर्षभरापासून सोन्याचे भाव वाढत असतानाच गोल्ड ईटीएफनेही दमदार कामगिरी करून गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. ऑगस्ट २०१९पासून गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंडात (ईटीएफ) २,४१४ कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे दिसून आले आहे. म्युच्युअल फंडांची शिखर संघटना असणाऱ्या असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया अर्थात अॅम्फीच्या ताज्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात गोल्ड ईटीएफमध्ये ७३१ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. तर, मार्च महिन्यात याच फंडांतून १९५ कोटी रुपयांची गुंतवणूक काढूनही घेण्यात आली आहे.

सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित असल्याच्या भावनेने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. त्यातच २०१९ आणि २०२० या वर्षात मे महिन्यापर्यंत सोन्याने चांगली कामगिरी केल्याने गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. सोन्याला २०११ नंतर प्रथमच अच्छे दिन प्राप्त झाल्याचे दिसून आले आहे. गोल्ड ईटीएफला मिळणाऱ्या पसंतीच्या पार्श्वभूमीवर एप्रिल२०२० अखेरीस या फंडांतील एकूण निधी ९,१९८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Super over: सुपर ओव्हर देखील टाय होते तेव्हा कोणते नियम लागू होतात; जाणून घ्या – all you need to know super over tied repeating...

दुबई: निर्धारीत ५० किंवा २० षटकात दोन्ही संघ जेव्हा समान धावा करतात तेव्हा सामना सुपर ओव्हर (super over) मध्ये जातो. सामना टाय आणि...

PM Modi: PM मोदींनी सांगितलं, त्यांच्या कुठल्या निर्णयाने होतेय करोना रुग्णसंख्येत घट – india has one of the highest recovery rates of 88 percent...

नवी दिल्ली: भारतात सध्या करोना संसर्गाच्या ( coronavirus india ) रुग्णांमध्ये घट झाली आहे आणि करोनातून बरे ( covid 19 india ) होण्याचे...

Recent Comments