Home देश पैसा पैसा gold price today in mumbai: खरेदीदारांसाठी संधी; सोन्या आणि चांदीच्या किमतीत घसरण!...

gold price today in mumbai: खरेदीदारांसाठी संधी; सोन्या आणि चांदीच्या किमतीत घसरण! – Todays Gold Price And Silver Rate In Mumbai And Across India


मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात होणारी वाढ आज रोखली गेली. फक्त सोन्याच्या दरात नाही तर चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. आज सकाळी १० च्या सुमारास मल्टी कमॉडिटी एक्सचेंज (MCX)मध्ये सोन्याचा दर ४७ हजार ०८२ रुपय प्रती १० ग्रॅम वर आला. गुरुवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंज (MCX)वर सोन्याचा भाव ८०० रुपयांनी तेजीत होता. रुपयाच्या तुलनेत डॉलर अधिक मजबूत झाल्याने किमतीवर परिणाम झाल्याचे जाणकारांनी सांगितले.

वाचा- करोनामुळे बंद झालं उत्पन्न; सहा मार्गातून मिळवा पैसे!

सराफा बाजारातसुद्धा आज सोन्याच्या किमतींमध्ये १० रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे. मुंबई २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६ हजार ११० रुपये झाला आहे. गुरुवारी तो ४६ हजार १०० रुपये होता. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव आता ४७ हजार ११० रुपये झाला आहे. त्यात आज १० रुपयांची वाढ झाली. चांदीसुद्धा १० रुपयांनी महागली आहे. चांदीचा भाव किलोला ४८ हजार ५१० रुपये झाला आहे. गुरुवारी चांदीचा भाव ४८, हजार ५०० रुपये होता.

वाचा- फ्लिपकार्ट भरणार तुमच्या कर्जाचे हप्ते; कसे ते वाचा

आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र आज सोन्याच्या किमती स्थिर होत्या. अमेरिकी डॉलर मजबूत अस्लयाने विदेशी बाजारपेठेत सोन्याचे दर १ हजार ७२७.२४ डॉलर इतका होता. तर चांदीचे दर ०.४ टक्क्यांनी घसरेल आणि ते १७.६४ डॉलरवर आले. मार्च महिन्यापासून विदेशी बाजारपेठेत सोन्याचे दर २० टक्क्यांनी वाढले आहेत.

वाचा- मंदी, मंदी आणि मंदी; शोरूम सुरू झाले तरी मागणी नाही!

पेट्रोल, डिझेलची पुन्हा दरवाढ

पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सलग सहाव्यांदा दरवाढ करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. पेट्रोलच्या दरात आज प्रतिलिटर ५७ पैसे तर डिझेलच्या दरात ५९ पैसे प्रतिलिटर इतकी वाढ आज करण्यात आलीय. गेल्या काही दिवसांतल्या दरवाढीने पेट्रोल ३.३१ रुपये तर डिझेल ३.४२ रुपयांची एकूण दरवाढ वाढ झाली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

राज्यपालांची ‘सक्रिय लुडबूड’ संविधानविरोधी!

अ‍ॅड. सुरेश पाकळे संविधानाने स्थापन केलेल्या लोकशाही संस्थांमध्ये, आपसांत संघर्ष होण्याची स्थिती, भारतात अनेक वेळा येत असते. राज्याचे व मुख्यमंत्री यांचे नेमके...

vaccination in aurangabad: करोना लसीकरणासाठी ३७३ ठिकाणे निश्चित – municipal corporation has identified 373 places for vaccination

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकरोनावरील आजारावरील लसीकरणासाठी महापालिकेने ३७३ ठिकाणे निश्चित केली आहेत. व्हॅक्सीनेटरची नावे देखील ठरविण्यात आली असून, ही सर्व माहिती पालिकेने शासनाला...

Recent Comments