Home देश पैसा पैसा gold rate today: सोने-चांदी तेजीत; जाणून घ्या आजचा भाव - Gold Silver...

gold rate today: सोने-चांदी तेजीत; जाणून घ्या आजचा भाव – Gold Silver Price Today


मुंबई : कमॉडिटी बाजारात ५०८८८ रुपये आहे. चांदीच्या दरात मात्र ४७५ रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदीचा भाव ६२३८१ रुपये झाला आहे. युरोपमध्ये करोनाची दुसरी लाट आली आहे. फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सोने दरात वाढ झाली आहे.

goodreturns या वेबसाईटनुसार मंगळवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९९६० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५०९६० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९४१० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५२९०० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९९६० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५१५१० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७२४० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५१४२० रुपये आहे.

चक्रवाढ व्याजमाफी ; रिझर्व्ह बँकेचे शिक्कामोर्तब, बँकांना दिले निर्देश
साथीच्या आजाराविषयी चिंता वाढल्याने मागील आठवड्यात सोन्याने ०.१ टक्क्यांनी वृद्धी घेतली. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून मिळणा-या अतिरिक्त मदतीबाबत अनिश्चितता असल्याने गुंतवणूकदारांमध्ये मौल्यवान धातूबद्दल आकर्षण वाढले आहे. अमेरिकेचे हाऊस स्पीकर नँसी पेलोसी यांनी अमेरिकेच्या डॉलरचे अवमूल्यन झाल्याचे तसेच नव्या कोरोना विधेयकबाबत चर्चा पुढे सुरू ठेवल्याचे वृत्त नोंदवले. मात्र प्रत्यक्ष कराराबाबत काहीही चिन्ह नसल्याने सोन्याच्या दरांबाबत सावधगिरी बाळगली गेली.

… तर भारताच्या रिटेल किंगला मालमत्ता विकावी लागणार
महागाई आणि चलन अवमूल्यन रोखण्यात सोने उपयुक्त ठरते. त्यामुळे २०२० मध्ये सोन्याने २५ टक्के वृद्धी दर्शवली. कमी व्याजदर आणि जागतिक बँकांनी अतिरिक्त तरलता आणल्याने ही वृद्धी दिसून आली. जागतिक कोरोना रुग्णसंख्येने ४१.७ दशलक्षांचा आकडा ओलांडला. त्यामुळे सुरक्षित मालमत्ता म्हणून सोन्याकडील कल वाढला. तसेच युरोपमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू झाल्याने सोन्याला आधार मिळाला. अतिरिक्त कोरोना मदतनिधीच्या कराराचे निश्चित चिन्हे दिसत नाही. त्यामुळे आजच्या व्यापारी सत्रात सोन्याच्या दरांमध्ये फार सुधारणा होणार नाही, असा अंदाज आहे.

युरोपमध्ये करोनाची दुसरी लाट आली आहे. फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत ३४ हजार ५०८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्येही वाढत्या करोनाला रोखण्यासाठी सरकारने काही भागात लॉकडाउनचे कठोर नियम लागू केले आहेत. वेल्समध्ये पूर्णपणे लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. ग्रेटर मॅनचेस्टर, लिव्हरपूल सिटी आणि लँकशायरमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

adult woman free to live with anyone anywhere: ‘प्रौढ तरुणी आपल्या मर्जीने कुठेही आणि कोणाबरोबरही राहण्यास स्वतंत्र’ – adult woman free to live with...

नवी दिल्लीः दिल्ली उच्च न्यायालयाने ( delhi high court ) बुधवारी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. प्रौढ महिला आपल्या मर्जीने कोणाबरोबरही आणि कुठेही राहण्यास...

‘त्या’ प्रसूतीबाबत पोलिसांनी मागविली कागदपत्रे

म. टा. खास प्रतिनिधी, अल्पवयीन मुलगी प्रसूतीसाठी दाखल होऊनही याबाबत पोलिसांना न कळविल्याने सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन अडचणीत आले आहे. या मुलीवर सामूहिक...

aurangabad News : अन्नातून करोना संसर्ग? ठोस पुराव्यांचा अभाव – corona infection from food; lack of concrete evidence

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: करोनाचा संसर्ग अन्नातून किंवा खाद्य पदार्थातून होण्याविषयी आतापर्यंत कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. गरम पाणी पिणे किंवा बाहेरून...

Recent Comments