Home देश पैसा पैसा gold rate today: सोने झाले स्वस्त : सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात...

gold rate today: सोने झाले स्वस्त : सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात घसरण – gold price down on second consecutive day


मुंबई : सराफा बाजारात शनिवारी सोने १६० रुपयांनी स्वस्त झाले. आज मुंबईत सोन्याचा भाव प्रती दहा ग्रॅम ४७९०० रुपये झाला. शुक्रवारी तो ४८०६० रुपये होता. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमती कमी झाल्या आहेत. चांदीचा भाव प्रती किलो ४७७०० रुपये आहे.

Good Returns या वेबसाईटनुसार दिल्लीत आज २२ कॅरेटचा भाव ४६७०० रुपयांवर कायम आहे. मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७२५० रुपये आहे. तर चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४६१८० रुपये भाव आहे. चेन्नईत सर्वात आधी सोन्याचा भाव ५० हजार रुपयांवर गेला आहे. आज चेन्नईत २४ कॅरेट सोन्याचा भाव ५०३९० रुपये झाला आहे. शुक्रवारी सोन्याच्या किमतीत २९० रुपयांची घसरण झाली होती. जाणकारांच्या मते , आफ्रिका आणि अमेरिकेतील सोन्याच्या खाणींमधील उत्खननाला करोना व्हायरसचा फटका बसला आहे. लॉकडाउन आणि कामगारांची वानवा यामुळे सोने उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमॉडिटी बाजारात सोने तेजीत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

चीनचा माल बंदरावरच अडकला; अमेरिकन कंपन्याही धास्तावल्या
अमेरिकी डॉलरचे मूल्य वाढल्याने इतर चलन धारकांसाठी सोने महाग झाले. शुक्रवारी स्पॉट गोल्ड १७५८.९५ डॉलर प्रती औंसवर बंद झाल्या. करोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने आठ्वडाभर सोन्याच्या किमतींवर परिणाम झाला. साथीच्या आजारानंतर आर्थिक सुधारणांचा काळ आधीच्या अंदाजापेक्षा खूप मोठा असू शकतो त्यामुळेही सोन्याच्या किंमतींत चढ उत्तर दिसून आले असे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे मुख्य विश्लेषक प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

जागतिक कमॉडिटी बाजारात चांदीचा भाव १७.९ डॉलर प्रती औंस राहिला. जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमधील आर्थिक कामकाज मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्याने कच्च्या तेलाचे दर १.८७ टक्क्यानी वाढून ३८.७ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. अनेक आशियाई, युरोपियन आणि अमेरिकी देशांनी त्यांच्या नागरिकांवर कामावर जाण्याची परवानगी दिल्याने बेरोजगारीचा उच्चांकी दर काही प्रमाणात कमी झाला.

सोन्याच्या किमतींचा रेकॉर्ड ; गाठला ८ वर्षांतील उच्चांकी स्तर
मागणी कमी झाल्याने ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंपनीने उत्पादनात तीव्र कपात केल्यानेही तेलाच्या किंमती वाढल्या. या महत्त्वाच्या निर्णयामुळे कच्च्या तेलाच्या दरांना आधार मिळाला. तथापि, अमेरिकेतील एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालांनुसार, यूएस क्रूड इन्व्हेंटरीची पातळी १९ जून २०२० रोजी संपलेल्या आठवड्यात १.४ दशलक्ष बॅरलनी वाढली. अमेरिकी क्रूड इन्व्हेंटरीची पातळी वाढल्याने जागतिक मागणी कमी झाल्याचे संकेत मिळतात. याचा परिणाम बाजारातील भावनांवर झाला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Elgar Parishad: पुणे: एल्गार परिषदेला पोलिसांची परवानगी, ३० जानेवारीला होणार आयोजन – police give permission to the elgar parishad it will be held on...

पुणे: येत्या ३० जानेवारीला गणेश क्रीडा मंच येथे एल्गार परिषदेचे (Elgar Parishad)आयोजन करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेला परवानगी दिलेली आहे. निवृत्त...

Recent Comments