Home देश पैसा पैसा Gold Rate Today in Mumbai: सोन्याचा भाव उतरला ; जाणून घ्या आजचा...

Gold Rate Today in Mumbai: सोन्याचा भाव उतरला ; जाणून घ्या आजचा दर


मुंबई : जागतिक बाजारात आज स्पॉट गोल्डचा भाव १७६३.४८ डॉलर प्रती औंस झाला आहे. त्यात ०.१ टक्के वाढ झाली. तर चांदीचा भाव १७.७४ डॉलर झाला आहे. करोनाने अर्थव्यवस्था कोलमडून गेली आहे. त्यामुळे भांडवली बाजारात अनिश्चितता आहे. अशा वेळी गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे आकर्षित होत आहेत, असे कमॉडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Good Returns च्या वेबसाईटनुसार आज मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७२०० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६८१० रुपये आहे. चेन्नईत तो ४६१७० रुपये आहे. चेन्नईत २४ कॅरेटचा भाव ५०३८० रुपये आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार गुरुवारी दिल्लीत सोन्याच्या किमतींमध्ये २९३ रुपयांची घसरण झाली. सोन्याचा भाव ४९०७२ रुपये झाला. चांदीमध्ये ५९८ रुपयांची घसरण झाली. चांदीचा भाव ४८७०५ रुपये प्रती किलो झाला.

पेट्रोल नव्वदीच्या उंबरठ्यावर ; सलग २० व्या दिवशी इंधन दरवाढ
जागतिक बाजारात मंगळवारी स्पॉट गोल्ड (SpotGold) ०.२ टक्क्याने वाढून १७६९.५९ डॉलर प्रती औंस झाले. २०१२ नंतरची जागतिक बाजारातील सोन्याची सर्वाधिक किंमत आहे. यापूर्वी २०१२ मध्ये १७७३ डॉलर प्रती औंस इतकी होती. आर्थिक पॅकेजच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत चालू वर्षात १६ टक्के वाढ झाली आहे.स्थानिक कमॉडिटी बाजारात बुधवारी सोन्याचं किमती ०.४ टक्क्यांनी वधारून ४८४२० रुपयांवर गेल्या. कमॉडिटी बाजारातला हा आतापर्यंतचा सार्वकालीन उच्चांकी दर ठरला आहे. याआधी ४८२८९ रुपयांचा रेकॉर्ड होता.

शेअर बाजारात उलथापालथ ; आठवड्याचा शेवट गोड होणार?
करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने बड्या देशांमधील केंद्रीय बँकांनी अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आर्थिक पॅकेजची तयारी सुरु केली आहे. परिणामी भांडवली बाजारातील संस्थात्मक गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांनी गुंतवणुकीची स्ट्रॅटेजी बदलली आहे. संस्थात्मक गुंतवणूकदार मौल्यवान धातूला गुंतवणुकीसाठी पसंत करत आहेत. महागाई आणि चलनातील अवमूल्यनाला हेजिंगचा भक्कम पर्याय म्हणूनदेखील सोने गुंतवणूकदारांना वरदान ठरत आहे.

सोने खरेदीमध्ये भारत हा जगातील मोठ्या ग्राहक देशांपैकी एक आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अंदाजानुसार भारतीयांकडे २२००० ते २५००० टन सोने आहे. त्यापैकी ६५ टक्के सोने हे ग्रामीण भारतात आहे. या अवाढव्य सोन्यापैकी केवळ १.२ टक्के सोने गहाण ठेवण्यात आले आहे. त्यामुळे गोल्ड लोन व्यवसायात प्रचंड संधी असल्याचे जाणाकरांचे म्हणणे आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Digilocker Service at Central Railway Station: रेल्वे प्रवाशांसाठी मध्य रेल्वे सुरू करणार ‘डिजीलॉकर’ – central railway has decided to start digilocker service in csmt...

म. टा. प्रतिनिधी, मुंबईछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दादर रेल्वे स्थानकात डिजीलॉकर सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. 'प्रथम...

Mumbai local train: ‘सर्वांसाठी नाही तर विद्यार्थ्यांसाठी तरी लोकल ट्रेन सुरू करा’ – kalyan-kasara railway passengers welfare association demands to allowed students for travels...

म. टा. प्रतिनिधी, मुंबईकरोनाकाळात बंद असलेल्या शाळा, महाविद्यालय, आयटीआय यासारख्या शैक्षणिक संस्था आता हळूहळू सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. मुंबई लोकलच्या सुमारे ९० टक्के...

LIVE : गडचिरोलीतील 350 ग्रामपंचायतीसाठी आज मतमोजणी | Maharashtra

सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुशखबर सर्वांसाठी लोकल प्रवासाची लवकरच मुभा? 'न्यूज18 लोकमत'ची एक्सक्लुझिव्ह माहिती लोकलसंदर्भात आज महत्वपूर्ण बैठक Source link

Recent Comments