Home शहरं कोल्हापूर gold scissors: gold scissors : कोल्हापुरात चक्क सोन्याच्या कात्रीने ग्राहकांचे केस कापले...

gold scissors: gold scissors : कोल्हापुरात चक्क सोन्याच्या कात्रीने ग्राहकांचे केस कापले – कोल्हापूर न्यूज: hair salon reopen after lockdown in maharashtra


कोल्हापूर: तब्बल तीन महिन्यानंतर सलून सुरू झाल्याने नाभिक समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे कोल्हापुरातील एका सलून चालकाने सलून सुरू झालं म्हणून दुकानात आलेल्या पहिल्या ग्राहकाचे सोन्याच्या कात्रीने केस कापले आहेत. त्यामुळे पंचक्रोशीत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ( gold scissors )

अटी आणि शर्तींवर आजपासून राज्यात सलून सुरू झाले आहेत. सलूनमध्ये फक्त कटिंग आणि हेअर डाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तीन महिन्यानंतर सलून सुरू झाल्याने नाभिक समाजामध्ये आनंदाचं वातावरण आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सलून बंद होते. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. सलून सुरू होण्यासाठी अनेक सलून चालकांनी देव पाण्यात घातले होते. उत्पन्नाचं कोणतंच साधन नसल्याने या सलून चालकांनी आंदोलनही केलं होतं. कोल्हापुरातील रामभाऊ संकपाळ या सलून चालकाने तर सलून सुरू झाल्यास सोन्याच्या कात्रीने ग्राहकाचे केस कापण्याचा निश्चय केला होता. आज सलून सुरू होताच त्यांनी आपला हा निश्चय पूर्ण केला. सलून सुरू करताच त्यांच्या ‘मिरर सलून’मध्ये आलेल्या ग्राहकांचे चक्क सोन्याच्या कात्रीने केस कापण्यासही सुरुवात केली. त्यामुळे या सलूनची पंचक्रोशीत जोरदार चर्चा सुरू होती.

गेल्या तीन ते सव्वा तीन महिन्यानंतर सलून सुरू झाले. हे तीन महिने आमची उपासमार सुरू होती. आज सलून सुरू झाले. हा पहिलाच दिवस आमच्यासाठी सोन्याचा दिवस आहे. त्यामुळे मी निश्चय केल्याप्रमाणे पहिल्याच ग्राहकाचे केस सोन्याच्या कात्रीने कापले, असं रामभाऊ संकपाळ यांनी सांगितलं. तसेच गेल्या तीन महिन्यात आम्हाला प्रचंड नुकसान सोसावं लागलं. त्यामुळे नाभिक समाजासाठी ठोस आर्थिक मदत मिळाली पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे, असंही त्यांनी सांगितलं.

वाचा: सलून सुरू; ग्राहकांच्या थर्मल स्कॅनिंगनंतरच दुकानात प्रवेश

दरम्यान, आज राज्यात सलून आणि ब्युटीपार्लर सुरू झाले आहेत. करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सलून चालकांनीही बरीच खबरदारी घेतल्याचं दिसून येतं. आज सलून सुरू होणार म्हणून सलून चालकांनी सलूनची साफसफाई करून निर्जंतुकीकरण केलं आहे. अनेक सलूनमध्ये तिथले कर्मचारी तोंडाला मास्क, अॅप्रन आणि हातात ग्लोव्हज घालून ग्राहकांची कटिंग करताना दिसत होते. शिवाय सलूनमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाच्या शरीरातील तापमान थर्मल स्कॅनिंगने तपासूनच त्याला आत प्रवेश दिला जात आहे. ग्राहकांना सॅनिटाइजही केलं जात आहे. प्रत्येक दुकानात सॅनिटायजेशन ठेवण्यात आलं आहे. अनेक सलून छोटे असल्याने ग्राहकांना बाहेरच थांबवले जात असून काही ठिकाणी ग्राहकांना नंबर देऊन ठरावीक वेळेत दुकानात बोलावले जात आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचा सोमय्या रुग्णालयाला दणका

चिंता वाढली- ठाणे, कल्याण-डोंबिवलीतही वाढली रुग्णसंख्याSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jameel shaikh murder: Jameel Shaikh Murder: जमील शेख हत्या: शूटर्सना ‘त्याने’ कारमधून मालेगावात सोडले आणि… – jameel shaikh death shooters went to malegaon in...

ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी शाहिद लायक शेख (३१) या आरोपीला...

Recent Comments