Home महाराष्ट्र gondiya tragedy: गोंदियात हळहळ; विहिरीत गुदमरून एकाच कुटुंबातील तिघांसह चौघांचा मृत्यू -...

gondiya tragedy: गोंदियात हळहळ; विहिरीत गुदमरून एकाच कुटुंबातील तिघांसह चौघांचा मृत्यू – gondiya 4 person died into well due to poisonous gas at pangaon in amgaon


गोंदिया: घराच्या अंगणात बांधलेल्या विहिरीतील अस्वच्छ पाणी मोटारीने उपसण्यासाठी विहिरीत उतरलेल्या तरुणासह त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या तिघांचाही गुदमरून मृत्यू झाला. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील पानगावात आज सकाळी ही घटना घडली.

भैयालाल भांडारकर, झनक आत्माराम भांडारकर, आत्माराम भांडारकर आणि धनराज गायधने अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आत्माराम भांडारकर यांनी आपल्या शेतावरील घरासमोरील अंगणात विहीर खोदली होती. या विहिरीचे आज, गुरुवारी सकाळी पूजन होते. त्या विहिरीचे पूजन करण्यासाठी हे सर्व जण तेथे गेले होते. पूजन करायचे असल्याने आदल्या दिवशीच त्यांनी विहिरीत ब्लिचिंग पावडर, फिटकरी, तुरटी यांचे मिश्रण टाकले होते. गढूळ आणि दूषित पाणी काढण्यासाठी मोटरपंप लावला होता.

maharashtra times

पानगाव येथे विहिरीत गुदमरून चौघांचा मृत्यू

तरुणाच्या शरीराचे तुकडे करून नदीत फेकले; अकोल्यात खळबळ

भयानकच! ४ वर्षीय मुलाला बादलीत बुडवून मारलं; शेजारी महिलेचे अमानुष कृत्य

पंपाच्या साह्याने विहिरीतील अस्वच्छ पाणी बाहेर काढण्याचा त्यांचा विचार होता. विहिरीतील पंपचा फुटवॉल काढण्यासाठी झनक भांडारकर हा विहिरीत उतरला. मात्र, बराच वेळ झाला तरी तो बाहेर आला नाही. त्याचा विहिरीत गुदमरून मृत्यू झाला होता. त्याला पाहण्यासाठी एकापाठोपाठ आत्माराम भांडारकर आणि भैयालाल भांडारकर हे दोघेही उतरले. मात्र, तेही काही वेळ बाहेर आले नाहीत. तिघांचाही गुदमरून मृत्यू झाला. त्यांना बघण्यासाठी शेजारील गायधने देखील विहिरीत उतरले. मात्र, त्याचाही या विहिरीत विषारी वायुने गुदमरून मृत्यू झाला. या चौघांबरोबरच विहिरीत उतरलेला राधेश्याम नावाची व्यक्ती अस्वस्थ वाटू लागल्याने अर्ध्यावरूनच माघारी फिरली. त्यामुळे तो बचावला. या घटनेची माहिती पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाला मिळताच, ते घटनास्थळी पोहोचले. विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते. विहिरीत विषारी वायूमुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती गावात आणि परिसरात वाऱ्यासारखी पसरली. एकाच कुटुंबातील तिघांसह शेजारील तरुणाचाही मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

वर्ध्यात खळबळ; पत्नीवर गोळ्या झाडल्यानंतर लष्कराच्या जवानाची आत्महत्या

हनी ट्रॅपमध्ये अडकवले; खंडणी वसुली करणारी टोळी जाळ्यात

maharashtra times

पानगाव येथील दुर्घटनेनंतर लोकांची झालेली गर्दी

महिलेसमोर अश्लील चाळे करणारा इन्स्पेक्टर फरार, २५ हजार ‘इनाम’

बहिणीवरील बलात्काराचा त्याने ६ वर्षांनंतर ‘असा’ घेतला बदलाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus in aurangabad: करोनाचे ३४ रुग्ण; एकाचा मृत्यू – aurangabad reported 34 new corona cases and 1 death in yesterday

औरंगाबाद: जिल्ह्यात शुक्रवारी ३४ करोनाबाधितांची वाढ झाली. त्यात शहरी विभागात ३२, तर ग्रामीण भागात दोन रुग्णांचा समावेश आहे. शहरातील खासगी रुग्णालयात सिल्लोड तालुक्यातील...

Mamata Banerjee: ‘जय श्रीराम’च्या घोषणा; ममता बॅनर्जी संतापल्या, म्हणाल्या… – wb cm mamata banerjee anguish after jai shree ram slogans were raised

कोलकाताः नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कोलकात्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान मोदी यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या...

Recent Comments