Home शहरं कोल्हापूर Gopichand Padalkar: चंपा, टरबुजा म्हटलेलं कसं चालतं?; पाटलांचा राष्ट्रवादीला सवाल - chandrakant...

Gopichand Padalkar: चंपा, टरबुजा म्हटलेलं कसं चालतं?; पाटलांचा राष्ट्रवादीला सवाल – chandrakant patil reaction over hasan mushrif statement


कोल्हापूरः ‘कुणी कुणाला धमकी द्यायची आवश्यकता नाही. आम्ही कुणाला घाबरत नाही. सुरुवात कोणी केली महत्त्वाचे नाही. याचा शेवट काहीही होऊ शकतो,’ असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना दिला. कोल्हापुरात पत्रकारांशी ते बोलत होते.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. आम्हीही शिव्या देऊ शकतो, असा इशाराच त्यांनी भाजपच्या नेत्यांना दिला होता. याबाबत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘सुरुवात कुणी केली हे महत्वाचं नाही, पण महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडत चालली आहे. तुम्ही जे पेरता तेच उगवतं. एकत्र बसून बिघडलेली राजकीय संस्कृती नीट केली पाहिजे. अन्यथा याचा शेवट काहीही होऊ शकतो.

वाचाः पडळकरांची झोप उडेल अशा शिव्या देऊ; हसन मुश्रीफ संतापले

‘भाजपच्या नेत्यांवरही खूप खालच्या शब्दात टीका होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल देखील वाईट शब्द वापरले जातात. राज्यात कोण चंपा म्हणतं, कोण टरबुजा म्हणतं, हे कसं चालतं?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

वाचाः मुंबई पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच या पदावर महिलेची नियुक्ती

दरम्यान, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आम्हालाही शिव्या देता येतात. आता शिव्यांची मालिका सुरू झाली. गोपीचंद पडळकर याच्यामागे बोलवता धनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील आहेत, असा आरोप केला होता.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Jameel Shaikh Case One Arrested By Thane Police Crime Branch – Jameel Shaikh Murder: मनसे पदाधिकारी हत्या प्रकरणी पोलिसांना मिळाली महत्वाची माहिती

ठाणे: ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी जमील शेख (Jameel Shaikh Murder) यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू असून, रोज नवीन माहिती समोर येत आहे. शेख यांची...

International Flights Ban Till 31st December – आंतरराष्ट्रीय उड्डाणं ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, डीजीसीएचे निर्देश

नवी दिल्ली : करोना पार्श्वभूमीवर नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून (DGCA) आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरची स्थगिती ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलीय. नागरी उड्डाण महासंचालनालयानं दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबरपर्यंत...

Uddhav Thackeray: काळजावर झालेली ‘ती’ जखम कधीही भरून येणार नाही: उद्धव ठाकरे – cm uddhav thackeray released coffee table book titled atulya himmat in...

मुंबई: '२६ नोव्हेंबर हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. त्या दुर्दैवी घटनेला १२ वर्षे झाली, यापुढेही कित्येक वर्ष उलटतील, पण काळजावर झालेली...

Recent Comments