Home शहरं पुणे Gopichand Padalkar: Gopichand Padalkar: पवारांविरोधातील वक्तव्य भोवलं; पडळकरांविरोधात बारामतीत गुन्हा दाखल -...

Gopichand Padalkar: Gopichand Padalkar: पवारांविरोधातील वक्तव्य भोवलं; पडळकरांविरोधात बारामतीत गुन्हा दाखल – fir filed against gopichand padalkar at baramati


बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात खालच्या पातळीवरील टीका करणं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना चांगलंच भोवलं आहे. पडळकर यांच्याविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने काल बारामती शहर पोलिसांना गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले होते. आज पडळकर यांच्याविरोधात निदर्शने केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पडळकर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली असून पडळकर यांच्याविरोधात ५०५(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याआधी ‘जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत पोलीस स्टेशनवर ठिय्या मांडणार’, असा पवित्रा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता. त्यामुळे अखेर पोलिसांकडून पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पडळकर यांनी पवारांविरोधातील केलेलं विधान हे द्वेषपूर्ण असून जातीय आणि प्रादेशिक तेढ निर्माण करणारं आहे. त्यांचं विधान खोटं आणि आक्षेपार्ह असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, आज बारामतीसह औरंगाबाद, मनमाड, सोलापूर, ठाणे आणि मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निदर्शने करत पडळकर यांचा निषेध नोंदवण्यात आला. सोलापुरात तर गाढवाच्या चेहऱ्यावर गोपीचंद पडळकरांची प्रतिमा लावून निषेध करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. तर काही ठिकाणी त्यांचे पुतळे जाळूनही निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

मंत्र्यांना ४६ दिवसात जमलं नाही ते पवारांनी २ तासात करून दाखवलं

काल पंढरपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहेत. त्यांनी बहुजन समाजावर नेहमीच अन्याय केला. छोट्या समूहाला भडकवायचं आणि लढवायचं हेच धोरण त्यांनी राबवलं आहे. त्यांनी ६० बहुजन समाजाला झुलवत ठेवून राज्य केलं आहे. गेल्या ६० ते ७० वर्षांत त्यांनी बहुजन नेतृत्वाला पुढे येऊ दिले नाही, असं सांगतानाच पवारांकडे विचारधारा नाही, अजेंडा नाही आणि व्हिजनही नाही, अशी टीका पडळकरांनी केली होती.

Rohit Pawar: आजोबांवरील टीकेला रोहितदादांचे खास ‘पवार स्टाइल’ उत्तर

पवार हे धनगर आरक्षणावर पॉझिटिव्ह असतील असं वाटत नाही. त्यामुळे आम्ही येत्या अधिवेशनात धनगर आरक्षणाचा मुद्दा लावून धरू, असं सांगतानाच करोनाचं संकट गेल्यानंतर धनगर आरक्षणासाठी राज्यभरातील तरुण रस्त्यावर उतरतील, असंही त्यांनी सांगितलं होतं. पवार नाशिकला अवकाळी पाऊस झाल्यानंतर गेले. कोकणात वादळानंतर गेले. पण अद्याप नुकसानग्रस्तांना मदत मिळाली नाही, असा टोलाही त्यांनी लगावला होता.

sharad pawar: शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना; पडळकरांची जीभ घसरलीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Indo Nepal border: नेपाळ पोलिसांकडून गोळीबार; एका भारतीयाचा मृत्यू, एक बेपत्ता – indian national killed, one missing after police firing by nepal police

हायलाइट्स:सीमेवर नेपाळ पोलीस आणि तीन भारतीय नागरिकांत बाचाबाचीएका भारतीय नागरिकावर नेपाळ पोलिसांचा गोळीबारझटापटी दरम्यान सीमा पार करण्यात यशस्वी ठरल्यानं एकाचा जीव वाचलातिसरा साथीदार...

All India Marathi Literary Meet: साहित्य संमेलन मेअखेरीस? – all india marathi literary meet program will be postpone in may month due to coronavirus

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकशहरात २६ ते २८ मार्च या काळात होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करोनाच्या पार्श्वभूमीवर मे महिनाअखेरपर्यंत पुढे ढकलण्याचा...

Violence against women: बलात्कारी डॉक्टर गजांआड – aurangabad municipal corporation has suspended to rapist doctor

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल महिलेला डिस्चार्ज देण्यासाठी केबिनमध्ये बोलावून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरला महापालिकेने गुरुवारी बडतर्फ केले. कोव्हिड केअर...

Recent Comments