Home शहरं कोल्हापूर gopichand padalkar statement: Gopichand Padalkar: पडळकरांची झोप उडेल अशा शिव्या देऊ; हसन...

gopichand padalkar statement: Gopichand Padalkar: पडळकरांची झोप उडेल अशा शिव्या देऊ; हसन मुश्रीफ संतापले – ncp leader hasan mushrif reaction over the statment on gopichand padalkar statement over sharad pawar


कोल्हापूरः भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले आहेत. ‘आम्हालाही शिव्या देता येतात. आता शिव्यांची मालिका सुरू झाली. गोपीचंद पडळकर याच्यामागे बोलवता धनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील आहेत, असा आरोप ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.’ ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

‘देशाचे नेते शरद पवार यांच्यावर पडळकर यांनी जे व्यक्तव्य केले त्याचा मी निषेध करतो. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेच पडळकरचे बोलविता धनी आहेत. कितीही टोकाचे मतभेद असले तरी असे वक्तव्य करणे योग्य नाही. असं मुश्रीफ म्हणाले.

वाचाः मुंबई पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच या पदावर महिलेची नियुक्ती

नथुराम गोडसे याचे ज्या पध्दतीने उदात्तीकरण केलं जातंय तसंच उदात्तीकरण पडळकर याचंही केलं जातंय. अशा वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली तर याला विरोधी पक्षच जबाबदार असेल. आता शिव्या देण्याची मालिका सुरू झाली. आम्ही देखील अशा शिव्या देवू. आमच्या शिव्यांनी त्यांना झोपाही लागणार नाहीत.’ असं हसन मुश्रीफ म्हणाले.

वाचाः पंढरपुरात प्रदक्षिणामार्गावर आढळला करोना रुग्ण; प्रशासनानं दिल्या ‘या’ सूचना

काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहेत. त्यांनी बहुजन समाजावर नेहमीच अन्याय केला. छोट्या समूहाला भडकवायचं आणि लढवायचं हेच धोरण त्यांनी राबवलं आहे. त्यांनी ६० बहुजन समाजाला झुलवत ठेवून राज्य केलं आहे. गेल्या ६० ते ७० वर्षांत त्यांनी बहुजन नेतृत्वाला पुढे येऊ दिले नाही, असं सांगतानाच पवारांकडे विचारधारा नाही, अजेंडा नाही आणि व्हिजनही नाही, अशी टीका पडळकरांनी केली होती.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Navi Mumbai Municipal Corporation: गुड न्यूज! ठाण्यानंतर आता नवी मुंबईतही नाट्यगृहांना मिळणार भाडे सवलत – navi mumbai municipal corporation has decided take discount to...

मुंबई टाइम्स टीमगेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले नाट्यप्रयोग सुरू व्हावेत म्हणून नाट्यसृष्टीकडून विविध प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाच्या प्रयत्नांना...

Srinagar terror attack: Srinagar Terror Attack: महाराष्ट्राचा वीरपुत्र यश देशमुख काश्मिरात शहीद; धक्क्याने आई बेशुद्ध – yash deshmukh martyred in terrorist attack in srinagar

जळगाव: जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील २२ वर्षीय जवान यश दिंगबर देशमुख हे शहीद...

Recent Comments