Home शहरं अहमदनगर ground water level: अकरा तालुक्यांत भूजल पातळीत घट - decrease in ground...

ground water level: अकरा तालुक्यांत भूजल पातळीत घट – decrease in ground water level in eleven talukas


म.टा.प्रतिनिधी,नगर

यावषर्षी मे महिन्यात भूजल पातळीत लक्षणीय घट झाल्याचे आढळून आले. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने केलेल्या पाहणीनुसार जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये मागील दहा वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत भूजल पातळी घटली आहे. जिल्ह्यात केवळ नगर, शेवगाव व श्रीरामपूर या तीन तालुक्यांमध्ये भूजल पातळीत अंशतः वाढ झाली आहे.

दरवषर्षी जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेंबर/ऑक्टोबर या महिन्यांमध्ये भूजल पातळीची पाहणी केली जाते. मे २०२० मध्ये केलेल्या पाहणीनुसार अकोला, जामखेड, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहाता, राहुरी, संगमनेर व श्रीगोंदा या अकरा तालुक्यांमध्ये भूजल पातळी मागील दहा वर्षांमधील सरासरीपेक्षा कमी झाल्याचे आढळले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर याकाळात विक्रमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे जानेवारी व मार्च महिन्यात भूजल पातळीत वाढ दिसून आली होती. मात्र, आता पुन्हा मे महिन्यात तब्बल अकरा तालुक्यांमध्ये भूजल पातळी घटल्याचे दिसत आहे. नगर, शेवगाव व श्रीरामपूर या तालुक्यांमध्ये भूजल पातळीत वाढ दिसत असली तरी त्याचे प्रमाण अल्प आहे. नगर तालुक्यातील भूजल पातळी ०.३६ मीटरने, शेवगाव तालुक्यातील ०.२८ मीटर व श्रीरामपूर तालुक्यातील ०.२४ मीटरने वाढली आहे. त्यामुळे यंदा पावसाने सरासरी न गाठल्यास भूजल संकट गडद होण्याचा अंदाज आहे.

पावसाची दडी

नगर जिल्ह्यामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला होता. मात्र, गेल्या सहा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments