Home देश पैसा पैसा GST collection improves: अर्थचक्र रुळावर; जूनमध्ये 'जीएसटी' महसुलाने सरकारला दिलासा - june...

GST collection improves: अर्थचक्र रुळावर; जूनमध्ये ‘जीएसटी’ महसुलाने सरकारला दिलासा – june gst collection improve crossed 90000 core


वृत्तसंस्था, नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) वसुली जूनमध्ये ९०,९१७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी जूनपेक्षा यंदा महसुलात नऊ टक्के घसरण झाली आहे. जून २०१९मध्ये वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून ९९,००० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये हा महसूल गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत ५९ टक्के राहिल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिली.

केंद्र सरकारचा दिलासा ; अल्पबचत व्याजदर ‘जैसे थे’
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, यंदा एप्रिलमध्ये जीएसटीच्या माध्यमातून ३२,२९४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. मे महिन्यात हा महसूल दुपटीने वाढून ६२,००९ कोटी रुपयांवर पोहोचला होता. जूनमध्ये मात्र जीएसटीच्या माध्यमातून मिळणारा महसूल जवळपास ५० टक्क्यांनी वाढून ९० हजार कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. करोना विषाणूचे संक्रमण होण्यापूर्वी दरमहा जीएसटीच्या माध्यमातून मिळणारा महसूल एक लाख कोटी रुपयांच्या आसपास होता. केंद्र सरकारने कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर जीएसटी विवरणपत्र भरण्याची मुदत वाढवून दिली होती. त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी जूनमध्ये अद्याप विवरणपत्र भरलेले नाही. काही विवरणपत्रे जुलैमध्ये भरली जाण्याची शक्यता आहे.

सीजीएसटी १८,९८० कोटींवर

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यामध्ये केंद्रीय जीएसटीच्या (सीजीएसटी) माध्यमातून १८,९८० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. राज्य जीएसटीच्या (एसजीएसटी) माध्यमातून २३,९७० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आयजीएसटीच्या माध्यमातून ४०,३०२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामध्ये १५,७०९ कोटी रुपये वस्तूंच्या आयातीच्या माध्यमातून प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे उपकरांच्या माध्यमातून ७,६६५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. डेलॉइट इंडियाचे पार्टनर एम. एस. मणी यांनी दिलेल्या माहितीनुसार जीएसटीच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न घटण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. गेले दोन ते तीन महिने लॉकडाउनमुळे अर्थचक्र थांबल्यामुळे अर्थव्यवस्था प्रभावित झाली होती.

मुंबई विमानतळ विकासात घोटाळा ; ‘CBI’ची मोठी कारवाई
करोनाचे संकट आणि कर महसूल आटल्याने हवालदिल बनलेल्या राज्य सरकारांना केंद्र सरकारने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जीएसटीची भरपाई दिली. मागील काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या वस्तू आणि सेवा कर भरपाईचे (GST Compensation) ३६४०० कोटी आज केंद्राने सरकारने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरित केले. यामुळे राज्यांना करोनाशी लढण्यासाठी आर्थिक बळ मिळणार आहे.

अर्थखात्याने याबाबत प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना आज वस्तू आणि सेवा कर भरपाईपोटी ३६४०० कोटी देण्यात आले आहेत. याआधी केंद्र सरकारने गेल्या आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीपर्यंत राज्य सरकारांना GST Compensation चे ११५०९६ कोटी वितरित केले होते. गेल्या महिन्यात देखील केंद्र सरकारने १५३४० कोटी जीएसटी भापाई म्हणून वितरित केले होते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kamala Harris dance in rain: पाहा: प्रचार सभेत पावसाची हजेरी; कमला हॅरीस थिरकल्या! – us election 2020 kamala harris dances in the rain during...

फ्लोरिडा: अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मतदानासाठी काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. त्यामुळे उमेदवारांकडून प्रचारासाठी जोर लावला जात आहे. प्रचारा दरम्यान काही हलके फुलके क्षणही...

aurangabad News : औरंगाबाद जिल्ह्यात ३४ हजार रुग्ण करोनामुक्त – 34 thousand patient beat coronavirus in aurangabad district

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्ह्यातील सहा बाधितांचा उपचारादरम्यान घाटीसह खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याने एकूण करोनाबळींची संख्या एक हजार ४२ झाली आहे. त्याचवेळी जिल्ह्यात मंगळवारी...

Rishabh Pant Try To Copy MS Dhonis Style Attempt Failed – Video धोनीचा कॉपी प्रयत्न फसला, पंतने करून घेतले हसं; पाहा शिखर धवनचा राग

नवी दिल्ली: IPL 2020आयपीएलच्या १३व्या हंगामात काल मंगळवारी किंग्ज इलेव्हन पंजाबने दिल्ली कॅपिटल्सवर ( kxip vs dc) पाच विकेटनी विजय मिळवला. या विजयामुळे...

Recent Comments