गुजरात कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष असलेले हार्दिक पटेल हे नगरपालिका निवडणुकीत अपयशी ठरले असून संपूर्ण राज्यात कॉंग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे हार्दिक ज्या पाटीदार समाजातून येतात त्या सूरतच्या बालेकिल्ल्यात कॉंग्रेसला खातेही उघडता आलेले नाही.
गुजरातच्या पालिका निवडणुकांमध्ये भाजपला चार पालिकांमध्ये बहुमत मिळालं आहे. त्याचवेळी सूरत जिल्ह्यातही पक्षाने ९३ जागा जिंकल्या आहेत. दुसर्या क्रमांकावर अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी आहे. ‘आप’ने २३ जागा जिंकल्या आहेत. तर सर्वात निराशाजनक कामगिरी कॉंग्रेसने केली आहे. काँग्रेस येथील पालिका निवडणुकीत खातेही उघडू शकलेली नाही. आणि सुरतला पाटीदारांचा बालेकिल्ला मानला जातो. कॉंग्रेसची सूत्रे पाटीदार नेते हार्दिक पटेल यांच्या हाती आहेत.
पाटीदारांना नेता मिळाला, आता पाटीदारांचा बालेकिल्ल्यातच पराभव
काही वर्षांपूर्वी कॉंग्रेस नेते हार्दिक पटेल यांना गुजरातमधील एक बडा पाटीदार नेता म्हणून प्रोजेक्ट केले जात होते. हार्दिक पटेल यांची लोकप्रियता पाहून त्यांना अनेक राज्यांत प्रचारासाठी बोलवण्यात आले. कॉंग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांनी त्यांना पक्षाच्या जाहीर सभांना आमंत्रित केले आणि त्यानंतर नेतृत्वाने त्यांना गुजरात कॉंग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. पण पाटीदारांना आपल्या बाजूने बळवण्याचा प्रयत्न करणारी कॉंग्रेस सूरतच्या बालेकिल्ल्यात हरली. कॉंग्रेसचा हा पराभव थेट हार्दिक पटेल यांचे अपयश मानले जात आहे.
इतर जिल्ह्यांमध्येही कॉंग्रेसची निराशाजनक कामगिरी
याशिवाय अन्य जिल्ह्यांमध्येही काँग्रेसची अशीच निराशाजनक कामगिरी आहे. गुजरातच्या नगरपालिका निवडणुकीत भाजपने आतापर्यंत ३८९ जागा जिंकल्या आहेत. कॉंग्रेसने ३९ जागा जिंकल्या आहेत. आम आदमी पक्षाने १४ आणि बसपाने ३ जागा जिंकल्या. त्याचवेळी एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.
Gujarat Civic Body Polls : गुजरात महानगरपालिका निवडणुकीत भाजप आघाडीवर
६ महापालिकांमध्ये भाजपला बुहमत
गुजरातमधील पालिका निवडणुकांमधील शानदार विजयाबद्दल भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नेत्यांचे अभिनंदन केले आहे. गुजरातमधील सर्व ६ महापालिकांमध्ये भाजपने मोठ्या बहुमताने विजय मिळवला आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्री विजय रुपाणी, प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील आणि पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्व मतदारांचे आभार, असं नड्डा म्हणाले.