वाचाः सख्खा भाऊच झाला वैरी; साखरेसाठी वस्तऱ्याने कापला गळा
राज्याचे व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा धरणगाव तालुका हा मतदारसंघ आहे. याच तालुक्यातील ते रहीवासी देखील आहेत. याच धरणगाव तालुक्यातील सतखेडा येथे नुकताच दुषित पाणीपुरवठा झाल्याने गावातील ४० ग्रामस्थ अस्वस्थ झाले होते. या सर्व ग्रामस्थांवर जिल्हा परिषदेच्या शाळेत उपचार करण्यात आले. यानतंर जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली. आज मंगळवारी या प्रकरणी चौकशीनतंर ग्रामसेवक नामदेव दगडू शिंपी यांना निलंबित करण्यात आल्याची माहीती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
वाचाः वारीला आठ शतकांची परंपरा; कोर्टाने वारकऱ्यांचे ‘हे’ आर्जव फेटाळले
जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दि. रा. लोखंडे , साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. बाळासाहेब बाभळे, तालुक्याच्या गट विकास अधिकारी स्नेहा कुडचे, उपअभियंता रमेश वानखेडे, जलनिरिक्षक दीपक राजपूत, पाणी गुणवत्ता सल्लागार धीरज भदाणे यांनी गावात पाहणी केली. पाईपलाईनची गळती दुरुस्ती करणे, पाणी शुध्दीकरणासाठी टी सी. एल. पावडरचा पुरेसा वापर करणेबाबत सरपंच व कर्मचारी यांना सूचना केल्या आहेत.