Home विदेश h1b visa suspend: डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'या' निर्णयामुळे भारतीयांना बसणार फटका! -...

h1b visa suspend: डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘या’ निर्णयामुळे भारतीयांना बसणार फटका! – us president donald trump may suspend h1b visa


वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या भारतीय व इतर देशांतील नागरिकांना झटका देणारा निर्णय घेणार आहेत. ‘एच१बी’ व्हिसासहित नोकरी देणारे इतर व्हिसा निलंबित करण्याचा निर्णय ट्रम्प घेणार असल्याचे वृत्त आहे. ‘एच१बी’ व्हिसाधारकांमध्ये भारतीयांची संख्या मोठी आहे. अमेरिकेत वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प हा निर्णय घेणार आहेत.

‘द वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तानुसार, अमेरिकन सरकार आगामी आर्थिक वर्षात या प्रस्तावाला मान्यता देऊ शकते. अमेरिकेत आर्थिक वर्ष एक ऑक्टोबरपासून सुरू होते. त्याचवेळी नवीन व्हिसा जारी करण्यात येतात. या निर्णयामुळे कोणत्याही नवीन एच१ बी व्हिसाधारकाला अमेरिकेत नोकरी करण्यास मनाई असणार आहे. व्हिसा निलंबन करण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतरच व्हिसाधारकांना नोकरी करता येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. एच१बी व्हिसा हा अमेरिकेतील कंपन्यांना परदेशातील नागरिकांना नोकरी करण्यास मान्यता देतो. यामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचा मोठा वाटा आहे.

वाचा: सीमावाद: भारत-अमेरिकेची जवळीक; चीनचा तिळपापड
वाचा: देशात करोनाचे थैमान; ट्रम्प सुरू करणार प्रचाराचा धडाका

अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये भारत आणि चीनमधून हजारो कर्मचाऱ्यांना नोकरी मिळते. विशेषत: भारतीय कर्मचाऱ्यांना अधिक मागणी असते. त्यामुळे ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयामुळे भारतीयांना मोठा धक्का बसणार आहे. करोनाच्या संकटामुळे याआधीच एच१बी व्हिसाधारकांना नोकरी गमवावी लागली आहे. अनेक भारतीय अमेरिकेतून मायदेशी परतले आहेत. अमेरिकेत एच१बी व्हिसावर काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांना कमी वेतन मिळत असल्याचेही एका अहवालात समोर आले होते. नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आहे. या निवडणुकीत करोनाच्या संकटासह बेरोजगारीचाही प्रमुख मुद्दा होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ट्रम्प हा निर्णय घेऊ शकतात, अशी चर्चा आहे.

आणखी वाचा:
अमेरिकेविरोधात उत्तर कोरियाची मोर्चेबांधणी; किम वाढवणार सैन्याची ताकद
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘या’ ट्विटने चीनचा तिळपापड!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Pune Atal Bus Service: पुणेकरांसाठी खूषखबर! पाच किलोमीटरचा प्रवास आता फक्त ५ रुपयांत – bjp leader chandrakant patil inaugurates atal bus service in pune

पुणे: 'पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या 'अटल' बस सेवेला आज सुरुवात झाली. या अंतर्गत पुणेकरांना पाच किलोमीटरपर्यंतचा प्रवास अवघ्या ५ रुपयांत करता येणार आहे....

cm uddhav thackeray: शेतकऱ्यांसाठी हवेत २४०० कोटी – marathwada farmers needs 2400 crore from package cm uddhav thackeray declared yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादपावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दहा हजार कोटी रुपयांचे 'पॅकेज' जाहीर केले असून, त्यातून मराठवाड्यासाठी २४०० कोटी रुपये...

chandrakant patil: खडसेंबद्दल विचारताच चंद्रकांत पाटील म्हणाले… रात गयी, बात गयी! – bjp leader chandrakant patil on eknath khadse

पुणे: भाजपला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज बोलणं टाळलं. 'रात गयी,...

Recent Comments