Home शहरं मुंबई hair salons reopen: salon: सलून सुरू; ग्राहकांच्या थर्मल स्कॅनिंगनंतरच दुकानात प्रवेश -...

hair salons reopen: salon: सलून सुरू; ग्राहकांच्या थर्मल स्कॅनिंगनंतरच दुकानात प्रवेश – hair salons reopen in maharashtra


मुंबई: राज्यभरातील सलून आज अखेर सुरू झाले आहेत. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करतानाच ग्राहकांचे थर्मल स्कॅनिंग करूनच त्यांना सलूनमध्ये प्रवेश दिला जात आहे. शिवाय सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं म्हणून अनेक सलून बाहेर ग्राहकांना ठरावीक अंतरावर बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तब्बल तीन महिन्यानंतर सलून सुरू झाल्याने कटिंग करण्यासाठी अनेक सलूनबाहेर ग्राहकांची गर्दी दिसत होती. ( salons reopen )

आजपासून सलून सुरू झाल्याने करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सलून चालकांनीही बरीच खबरदारी घेतल्याचं दिसून येतं. आज सलून सुरू होणार म्हणून सलून चालकांनी सलूनची साफसफाई करून निर्जंतुकीकरण केलं आहे. अनेक सलूनमध्ये तिथले कर्मचारी तोंडाला मास्क, अॅप्रन आणि हातात ग्लोव्हज घालून ग्राहकांची कटिंग करताना दिसत होते. शिवाय सलूनमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाच्या शरीरातील तापमान थर्मल स्कॅनिंगने तपासूनच त्याला आत प्रवेश दिला जात आहे. ग्राहकांना सॅनिटाइजही केलं जात आहे. प्रत्येक दुकानात सॅनिटायजेशन ठेवण्यात आलं आहे. अनेक सलून छोटे असल्याने ग्राहकांना बाहेरच थांबवले जात असून काही ठिकाणी ग्राहकांना नंबर देऊन ठरावीक वेळेत दुकानात बोलावले जात आहे.

चिंता वाढली- ठाणे, कल्याण-डोंबिवलीतही वाढली रुग्णसंख्या

ज्या ग्राहकांना सर्दी, ताप, खोकला असेल अशा ग्राहकांची कटिंग केली जात नाही. काही ग्राहक फोन करून दुकानात येण्याची वेळ घेतात. त्यांना आधी ताप, सर्दी, खोकला किंवा त्वचेशी संबंधित विकार आहेत का? हे विचारलं जातं. त्यानंतरच त्यांना वेळ दिली जाते. वरीलपैकी एकही लक्षण असेल तर ग्राहकांना वेळ दिली जात नाही, असं एका सलून चालकांनी सांगितलं. झोपडपट्टी परिसरातही सलून सुरू झालं आहे. तिथेही दुकानाबाहेर ग्राहकांची गर्दी पाह्यला मिळाली. मात्र, या ठिकाणीही सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचा सोमय्या रुग्णालयाला दणकाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ind vs aus first ODI: टीम इंडियासाठी अलर्ट; पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाचे पारडे जड, जाणून घ्या कारण – ind vs aus first odi australia can...

नवी दिल्ली: भारतीय संघ आठ महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. उद्यापासून म्हणजेच २७ नोव्हेंबरपासून भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. भारताच्या दौऱ्याची...

Recent Comments