Home देश Handwara encounter: कर्नल शर्मा शहीद झाल्यावर दहशतवादी मोबाइलवर म्हणाला.... - handwara encounter...

Handwara encounter: कर्नल शर्मा शहीद झाल्यावर दहशतवादी मोबाइलवर म्हणाला…. – handwara encounter after the martyrdom of the colonel terrorist picked the call on his phone and said, salam walekum


नवी दिल्लीः काश्मीरच्या हंदवाडामध्ये शनिवारपासून सुरू झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाच जवान शहीद झाले. पण यापूर्वी त्यांनी नागरिकांचे प्राण वाचवले. चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. पण यात लष्कराचे कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज सूद, नायक राजेश, लांस नायक दिनेश आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील उपनिरीक्षक शकील काझी हे पाच जण शहीद झाले.

चार दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर राष्ट्रीय रायफल्सचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांच्या शोधासाठी संयुक्त मोहीम राबवली. यानंतर शनिवारी लष्कराला आणखी माहिती मिळाली आणि दहशतवाद्यांशी जवानांची चकमक सुरू झाली. पण दहशतवादी तिथून निसटले.

भारतीय लष्करातील २१ राष्ट्रीय राफल्सच्या युनिटचे सीओ कर्नल आशुतोष शर्मा यांच्या नेतृत्वा शनिवारी दुपारी दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरू होती. त्यावेळी एका घरात संश्यास्पद हालचाली होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. कर्नल शर्मा त्या ठिकाणी गेले. तिथे एका घरात दहशतवाद्यांनी नागरिकांना ओलीस धरले होते. यानंतर कर्नल शर्मा यांच्या टीमने जवळपास राहणाऱ्या सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली. नागरिकांना बाहेर काढत असताना लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला. यावेळी लष्कराची दुसरी टीमही तिथे पोहोचली आणि त्यांनी घराला वेढा घातला.

घराला वेढा घातल्यानंतर दुसऱ्या टीमने कर्नल शर्मा यांच्या टीमशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क झाला नाही. गोळीबारात टीमच्या रेडिओ सेटचंही मोठ नुकसान झालं होतं. रात्र झाली होती आणि त्यातच मुसळधार पाऊस सुरू होता. सर्व प्रयत्न करून झाल्यावर कर्नल शर्मांच्या टीमशी संपर्क न झाल्यानं अखेर शर्मांच्या मोबाइलवर फोन करण्यात आला. हा फोन एका दहशतवाद्याने उचलला. फोन उचलल्यावर हा दहशवादी सलाम वालेकुम असं बोलला. काही वेळानी पुन्हा फोन लावला तर तेव्हाही दहशतवाद्याने फोन उचलला आणि सलाम वालेकुम म्हणाला.

हंदवाडा चकमक; देश जवानांचे बलिदान विसरणार नाहीः PM मोदी
अंधाराचा फायदा घेऊन हे लपून बसलेले दहशतवादी पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. पण लष्कराच्या दुसऱ्या टीमने त्यांचा खात्मा केला. यात दोन दहशतवादी मारले गेले. यातील एक दहशतवादी हा लश्कर ए तोयबाचा कमांडर हैदर असल्याचं सांगण्यात येतंय. लष्कराची ही टीम घरात गेली त्यावेळी कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासह सर्व ५ जवानांचे शहीद झाल्याचे त्यांना आढळून आले. यानंतर लष्कराकडून आणखी दोन दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

इथं होतं दहशतवाद्यांचं रिसेप्शन

ही घटना घडली तो भाग कुपवाडा जिल्ह्यातील जंगल परिसर आहे. नियंत्रण रेषेतून भारतीय सीमेत घुसखोरी करून आलेल्या दहशतवाद्यांचा हा रिप्सेशन परिसर आहे. काश्मीर खोऱ्यात लपून असलेले दहशतवादी घुसरखोरी करून आलेल्या दहशतवाद्यांना या परिसरात घेण्यासाठी जातात. हे चार दहशतवादी घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना घेण्यासाठी आले असावेत, अशी शक्यता लष्करातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केलीय. सीमेपलिकडून या भागात दहशदवादी सतत घुसखोरीच्या प्रयत्नात असतात.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ind vs aus first ODI: टीम इंडियासाठी अलर्ट; पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाचे पारडे जड, जाणून घ्या कारण – ind vs aus first odi australia can...

नवी दिल्ली: भारतीय संघ आठ महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. उद्यापासून म्हणजेच २७ नोव्हेंबरपासून भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. भारताच्या दौऱ्याची...

gujarat coronavirus: एक अॅम्ब्युलन्स अन् चार मृतदेह… गांधीनगरमध्ये करोनाने होणारे मृत्यू लपवले जाताहेत? – gujarat coronavirus dead bodies in ambulance photo viral nitin patil...

अहमदाबादः गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये ( gujarat coronavirus ) सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल ( viral photo ) होतोय. या व्हायरल फोटोत एका...

Recent Comments