Home देश Handwara encounter: काश्मीरच्या हंदवाडात चकमक; दोन अधिकाऱ्यांसह ५ जवान शहीद - colonel...

Handwara encounter: काश्मीरच्या हंदवाडात चकमक; दोन अधिकाऱ्यांसह ५ जवान शहीद – colonel and major among five security personnel martyred in encounter with terrorists


श्रीनगर

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान हंदवाडात झालेल्या चकमकीत लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह पाच जवानांना वीरमरण आलं आहे. तर दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात लष्कराला यश आलं आहे.

शहीद जवानांमध्ये कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील उपनिरीक्षक शकील काझी यांचा समावेश आहे.

हंदवाडाच्या चंजमुल्ला भागात दहशतवाद्यांनी काही नागरिकांना ओलीस ठेवलं होतं. त्यांची सुखरुप सुटका करण्यासाठीच्या मोहिमेवर असलेल्या पथकाचं कर्नल आशुतोष शर्मा हे नेतृत्व करत होते, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली.

भारतीय लष्कराच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,चंजमुल्ला भागात एका घरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. दहशतवाद्यांनी काही नागरिकांनाही ओलीस ठेवलं होतं. दहशतवाद्यांचा बिमोड करुन नागरिकांची सुखरूप सुटका करण्यासाठी भारतीय लष्कराने मोहिम आखली होती. यात दहशतवादी आणि लष्करामध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. यात २१ राष्ट्रीय रायफल्स तुकडीचे कर्नल आणि मेजर यांना आपला जीव गमावावा लागला. त्यांच्यासोबत आणखी तीन जवानही यात शहीद झाले. यात जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे. भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचा बिमोड करुन ओलीस असलेल्या सर्व नागरिकांची सुखरूप सुटका केली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Shirdi Saibaba Temple: Saibaba Temple: साईचरणी ९ दिवसांत कोट्यवधींचे दान; सहा देशांचे चलनही तिजोरीत! – saibaba temple gets rs 3 crore donations in 9...

नगर: राज्य सरकारच्या आदेशाने शिर्डीचे श्री साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आल्या पासून (१६ नोव्हेंबर) ते काल, मंगळवारपर्यंत सुमारे ४८ हजार...

aurangabad News : वीज बिल फाडून मनसेचे आंदोलन – mns agitation by tearing up electricity bill

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादवाढीव वीज बिलाबाबत महावितरण विभागाकडून नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी काही उपाय योजना केली जात नाहीत, असा आरोप करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

LIVE : पुन्हा राजकीय ठिणगी पेटणार, उद्धव ठाकरेंची मुलाखत लवकरच होणार प्रसारित

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स Source link

Recent Comments