Home देश Handwara encounter: हंदवाडा चकमक; देश जवानांचे बलिदान विसरणार नाहीः PM मोदी -...

Handwara encounter: हंदवाडा चकमक; देश जवानांचे बलिदान विसरणार नाहीः PM मोदी – handwara encounter martyrs sacrifice will never be forgotten says pm narendra modi


नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा येथील चकमकीत शहीद झालेल्या जवानांना पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली वाहिली आहे. हंदवाडामध्ये शहीद झालेले जवान आणि सुरक्षा दलांना नमन. त्यांचे शौर्य आणि बलिदान देश विसरणार नाही. त्यांनी प्राणांची आहुती देऊन नागरिकांची सुरक्षा केली, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

जवानांचे बलिदान चिंताजनकः राजनाथ सिंह

चकमकीत शहीद झालेल्या जवानांवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. जवानांनी दहशतवाद्यांविरोधातील या लढाईतून शौर्या गाथा लिहिली आहे. त्यांची वीरता आणि संघर्ष कायम स्मरणात राहील, असं राजनाथ सिंह म्हणाले. हंदवाडात सुरक्षा दल आणि जवानांचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान चिंता वाढवणारे आणि वेदनादायी आहे. त्यांनी दहशतवाद्यांविरोधातील या लढाईत पराकोटीचे साहस दाखवत देश सेवेत प्राणांचे बलिदान दिले. त्यांची शूरता देश विसरणार नाही, असं म्हणत राजनाथ यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत जवानांना श्रद्धांजली वाहिली.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी शहीद जवानांना सॅल्यूट केला आहे. भारतीय सैन्याला शहीद जवानांच्या वीरतेवर गर्व आहे. त्यांनी यशस्वीपणे दहशतवाद्यांना ठार केले. या वीर जवानांना सॅल्यूट आहे, असं रावत म्हणाले.

हंदवाडा चकमक: दोनदा ‘शौर्य पदक’ पटकावणारे कर्नल शर्मा शहीद

हंदवाडा चकमकीत लष्कर ए तोयबाच्या ‘हैदर’ला कंठस्नान

हंदडावामधील चकमकीत कर्नल आणि मेजरसह ४ जवान शहीद झालेत. यासह जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक पोलीस उपनिरीक्षकही यात शहीद झाला आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. यात पाकिस्तानातील लश्कर-ए-तोयबाचा कमांडर हैदर याचा खात्मा करण्यात आला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Maharashtra minister: धान खरेदी केंद्र वाढवा – maharashtra minister chhagan bhujbal has directed increase number of grain shopping centre to administration

म. टा. प्रतिनिधी, मुंबई विदर्भात गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील धान खरेदीबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली....

PMJJY available in Postal Payment bank: PMJJY जीवन ज्योती योजना; पोस्ट पेमेंट बँकेतही मिळणार जीवन ज्योती विमा – jeevan jyoti yojana now available in...

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमध्येही (आयपीपीबी) आता पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी आयपीपीबीने पीएनबी मेटलाइफ...

father and son found dead in apegaon paithan: बिबट्या जाळ्यात येईना; तीन जिल्ह्यात दहशत – father and son found dead in apegaon paithan due...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादबिबट्याने केलेल्या हल्ल्यात पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना पैठण तालुक्यातील आपेगाव शिवारात घडल्यानंतर या परिसरात दहशत निर्माण झाली आहे. पैठण परिसरातील...

Recent Comments