Home क्रीडा Harbhajan Singh: आफ्रिदीला मोदींविरोधात बोलायचा हक्क नाही, हरभजन भडकला - harbhajan singh...

Harbhajan Singh: आफ्रिदीला मोदींविरोधात बोलायचा हक्क नाही, हरभजन भडकला – harbhajan singh slams shahid afridi for comments against indian pm narendra modi


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने टीका केली होती. काश्मीरच्या मुद्द्यावरून आफ्रिदीने भारतासहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले होते. त्यामुळे आफ्रिदीवर आता भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग हा चांगलाच भडकलेला पाहायला मिळत आहे. भारत आणि मोदी यांच्याविरोधात बोलायचा हक्क आफ्रिदीला कोणी दिला, असा सवालही त्याने विचारला आहे.

वाचा- पाकिस्तानला काश्मीर मिळणार नाही, गंभीरचे आफ्रिदीला खडे बोल

नरेंद्र मोदी हे भित्रे आहेत. कारण त्यांनी सात लाख सैन्य फक्त काश्मीरमध्येच ठेवले आहे. आमच्या देशाचा विचार केला तर पाकिस्तानात मिळून सात लाखांचे सैन्य आहे. त्यांच्या मागे आमचे २० कोटी लोकांचे सैन्यही आहेच, असे वक्तव्य आफ्रिदीने केले होते. आफ्रिदीने मोदी यांच्यावर टीका करताना पातळी सोडली होती. त्यामुळे आता त्याच्यावर भारतीय क्रिकेटपटू तोफ डागताना दिसत आहे. आफ्रिदीच्या टीकेला आता चोख उत्तर मिळत आहे. पण पाकिस्तानमधील हे माजी क्रिकेटपटू गरळ ओकायची कधी थांबवणार, हा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे.

भारताचा माजी सलामीवीर आणि भाजपाचा खासदार गौतम गंभीरने आफ्रिदीला चांगलेच खडसावले होते. गंभीर म्हणाला की, ” पाकिस्तानची लोकसंख्या २० कोटी एवढी आहे, तर त्यांच्याकडे सात लाखांचे सैन्य आहे. तुम्ही गेल्या ७० वर्षांपासून काश्मीरची भीक मागत आहेत. भारत आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणारे आफ्रिदी आणि इम्रान खान हे जोकर आहेत. कारण ते पाकिस्तानच्या लोकांची फसवणूक करत आहेत. त्याचबरोबर ते मोदी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत. जेव्हा निर्णय येईल, तेव्हा तुम्हाला काश्मीर मिळणार नाही. तुम्हाला बांगलादेश लक्षात आहे ना? “

हरभजननेही आता आफ्रिदीचा चांगलाच समाचार घेतला आहे. हरभजन म्हणाला की, ” यापूर्वी आफ्रिदीला मी माझा मित्र समजत होतो. त्यामुळे त्याच्याशी संवाद होत होता. पण आता भारत आणि मोदी यांच्यावर टीका केल्यावर त्याचे आणि माझे सर्व संबंध संपले आहेत. मोदींवर टीका करण्याचा अधिकार आफ्रिदीला कोणी दिला…”Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे यांचं जावडेकरांना महत्त्वाचं पत्र; केली ‘ही’ विनंती – mangrove conservation aditya thackerays letter to prakash javadekar

मुंबई: राज्यातील खासगी जमिनीवरील खारफुटीचे संरक्षण करण्याचे तसेच या जमिनीवरील खारफुटींवर अतिक्रमण किंवा बांधकाम केल्यास वा सीआरझेड तरतुदींचा भंग केल्यास त्यावर कारवाई करण्याचे...

तंबाखूजन्य पदार्थांचे नाशिकरोडला घबाड – police seize banned tobacco items worth rs 11 lakhs

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोडनाशिकमध्ये गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा चोरटा व्यवसाय सर्रास सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. नाशिकरोड येथे अन्न व औषध प्रशासनाने...

Recent Comments