Home क्रीडा Harbhajan Singh: हरभजन सिंगच्या आवाहनानंतर चीनला मिरच्या झोंबल्या! - Editor-In-Chief Of Chinese...

Harbhajan Singh: हरभजन सिंगच्या आवाहनानंतर चीनला मिरच्या झोंबल्या! – Editor-In-Chief Of Chinese The Global Times Reacts On Harbhajan Singhs Boycott Chinese Goods


नवी दिल्ली: लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत – चीन सैनिकांदरम्यान झालेल्या हिंसक झडपेनंतर सीमेवर तणाव आहे. चीनी लष्करासोबत झालेल्या झडपेत २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर देशात चीन विरोधी वातावरण आहे. अनेक जण चीनी वस्तूंवर बहिष्कार करण्याचे आवाहन करत आहे.

वाचा-क्रिकेटमधील सर्वात महाग ४ कॅच; टीम इंडियाला मिळाली एवढी मोठी शिक्षा!

भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. हरभजनचे हे आवाहन चीनला चांगलेच झोंबल्याचे दिसते. चीनच्या कम्यूनिस्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सला हरभजनचे हे आवाहन आवडले नाही. हरभजन सिंगच्या या आवाहनाची दखल थेट ग्लोबल टाइम्सचे संपादक हु शी जिन यांनी घेत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा- क्रिकेटपटूच्या आईचे निधन; सोशल मीडियावरून दिली…

ग्लोबल टाइम्सच्या संपादकांना हरभजन सिंगने केलेले आवाहन आवडले नाही. सोशल मीडियावर जिन म्हणतात, चीन त्या काळापासून फार लांब गेला आहे. जेव्हा स्टार किंवा सेलिब्रिटी विदेशी वस्तूंवर बहिष्काराचे आवाहन करत असत. हे (हरभजन) भारतातील एक प्रसिद्ध क्रीडापटू आहेत आणि ते भारताच्या महान संस्कृतीची नकारात्मक आणि मागे पडलेले चित्र दाखवत आहेत.

वाचा- वनडेत गोलंदांजाची अशी धुलाई कधीच झाली नाही; केल्या ४८१ धावा!

लडाखमधील घटनेनंतर हरभजनने शुक्रवारी एक ट्विट केले होते.

‘शरीर एवं राष्ट्र…. दोनों को स्वस्थ रखने का एक ही उपाय है, ‘चीनी बन्द’
शरीर के लिए “देसी गुड़”* और
राष्ट्र के लिए “देसी Goods”

अशी पोस्ट हरभजनने केली होती. त्याच्या या ट्विटवरच ग्लोबल टाइम्सच्या संपादकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा- सुशांतच्या ५० स्वप्नांमध्ये एक होते क्रिकेट खेळण्याचे स्वप्न; पाहा व्हिडिओ

मे महिन्याच्या सुरुवातीला चीनच्या फौजांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या हद्दीत प्रवेश केला. त्यानंतर चिनी सैन्याने माघारी जावे यासाठीही भारतीय सैनिकांनी त्यांना सुनावले. या दरम्यान वादावादी झाली होती. या घटनेनंतर दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले होते. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढतच आहे.

२०१६ मध्ये चीनकडून २९६ वेळा घुसखोरी करण्यात आली, २०१७ मध्ये ४७३, तर २०१८ मध्ये ४०४ वेळा घुसखोरीचा प्रयत्न झाला. गलवान खोरे आणि नाकू ला सेक्टरसारख्या भागांमध्ये चीनकडून वारंवार घुसखोरीचे प्रयत्न करत आक्रमकता दाखवली जात आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kangana Ranaut: वाईटावर चांगल्याचा विजय; कंगनानं पुन्हा राऊतांना डिवचलं – kangana ranaut attacks on cm uddhav thackeray, sanjay raut

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच तिच्या बेधडक वक्तव्यांमुळं चर्चेत असते. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या कंगानानं पुन्हा एकदा संजय...

Kalyan Kale: ‘देवगिरी’त बागडेंनी आडवे येऊ नये – former mla dr. kalyan kale warns to mla haribhau bagde over devgiri cooperative sugar factory

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री'देवगिरी कारखान्यावर प्रशासकीय मंडळ येणारच. कारखाना सुरू होणार यात शंका नाही. मात्र, या कामात आमदार हरिभाऊ बागडेंनी आडवे येऊ नये,'...

RCB vs CSK: RCB vs CSK IPL 2020: बेंगळुरू विरुद्ध चेन्नई प्रतिष्ठ वाचवण्यासाठी खेळणार – rcb vs csk ipl 2020 match preview update and...

दुबई: IPL 2020आयपीएलच्या १३व्या हंगामात आज रविवारी डबल हेडरमधील पहिली लढत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Royal Challengers Bangalore vs Chennai...

Recent Comments