Home शहरं औरंगाबाद Harshvardhan Jadhav : 'बजाज देवापेक्षा मोठे आहेत का? त्यांची कंपनी तातडीनं बंद...

Harshvardhan Jadhav : ‘बजाज देवापेक्षा मोठे आहेत का? त्यांची कंपनी तातडीनं बंद करा’ – Former Mla Harshvardhan Jadhav Demands Thackeray Sarkar To Close Bajaj Plant In Aurangabad


औरंगाबाद: ‘औरंगाबादच्या बजाज कंपनीतील १४० कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतरही ही कंपनी सुरू आहे. हे सरळसरळ नियमांचे उल्लंघन आहे. श्रीमंतांची खळगी भरण्यासाठी प्रशासन लाचार झालं आहे. बजाज हे देवापेक्षा मोठे आहेत का? ही कंपनी तात्काळ बंद करा,’ अशी जोरदार मागणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे. (Former MLA Harshvardhan Jadhav demands to close Bajaj Plant)

वाचा: रिक्षा करून रुग्णालयातून पळालेल्या करोना रुग्णाचा मृत्यू

यू ट्यूबवर एक व्हिडिओ शेअर करून हर्षवर्धन जाधव यांनी ही मागणी केली आहे. औरंगाबादमधील बजाज कंपनीतील १४० कर्मचाऱ्यांना करोना झाल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं १८ मे २०२० रोजी जारी केलेल्या एका शासन निर्णयानुसार (जीआर) एखाद्या कंपनीत दोन किंवा अधिक कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळल्यास ती कंपनी तात्काळ बंद करून ४८ तासांत तिचं निर्जंतुकीकरण करणं अपेक्षित आहे. बजाजमध्ये तब्बल १४० कर्मचारी बाधित असतानाही कंपनी राजरोस सुरू आहे. बजाजचे खिसे भरण्यासाठी लोकांचा जीव धोक्यात घालण्याचा हा भयंकर प्रकार आहे. बजाजचे वरपर्यंत लागेबांधे असल्यामुळंच हे सुरू आहे,’ असा आरोप जाधव यांनी केला आहे.

वाचा: ‘लालबागचा राजा’चा गणेशोत्सव रद्द; मंडळाचा ऐतिहासिक निर्णय

‘कामगारांचे जीव धोक्यात घालून कंपनी चालवण्याची गरज नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ताबडतोब याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना बजाज कंपनी बंद करण्याचे आदेश द्यावेत. औरंगाबादमधील कोविड टास्क फोर्सचे प्रमुख जिल्हाधिकारी स्वत: आहेत. त्यांनी याबाबत लगेचच निर्णय घेऊन कंपनी बंद करावी आणि सॅनिटाइज करावी, अन्यथा प्रादुर्भाव वाढेल. प्रशासनानं हे केलं नाही तर मी केंद्राच्या जीआरच्या आधारे न्यायालयात जनहित याचिका दाखल करेन आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करेन, असा इशाराही जाधव यांनी दिला आहे.

‘बजाजमधील कर्मचाऱ्यांना कुठलाही आधार नाही. त्यांना कमलनयन बजाज रुग्णालयात दाखल करून घेतलं पाहिजे. पण ते होत नाही. पगाराचाही पत्ता नाही,’ असा आरोपही जाधव यांनी केला. ‘बजाज कंपनीशी माझं वैयक्तिक कुठलंही भांडण नाही. मात्र, करोनाची ही स्थिती असेल तर ती कंपनी बंद झालीच पाहिजे. बजाजच काय इतर कुठल्याही कंपनीत अशी स्थिती असेल तर ती बंद करायला हवी. औरंगाबादेतील लोकप्रतिनिधींनी या प्रश्नात लक्ष घातलं पाहिजे,’ असं ते म्हणाले.

वाचा: ‘देवळं बंद असताना तुमच्या रूपानं देव सगळ्यांना दिसतोय’Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments