Home शहरं कोल्हापूर Hasan Mushrif: मुश्रीफ म्हणाले, मटण खायचंय तर सर्किट हाऊसमध्ये खा, मी देतो...

Hasan Mushrif: मुश्रीफ म्हणाले, मटण खायचंय तर सर्किट हाऊसमध्ये खा, मी देतो पैसे! – eat mutton in circuit house i will pay says hasan mushrif


कोल्हापूर:करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शिक्षणासाठी खास शैक्षणिक टीव्ही चॅनेल निर्माण करण्याच्या शक्यता आजमावल्या जात आहेत, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटपाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा परिषद सभागृहातच ‘रस्सा मंडळ’ करणाऱ्या सदस्यांना शब्दाचे फटके लगावताना ‘हवे असेल तर रोज सर्किट हाऊसला जाऊन मटणावर ताव मारा, मी पैसे देतो’ असा टोला त्यांनी मारला.

वाचा: आमचं पॅकेज ऐकून भाजपला भोवळ येईल: हसन मुश्रीफ

जिल्हा परिषदेत सध्या जे काही चालले आहे ते बरोबर नाही, याकडे लक्ष वेधत मंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्हा परिषदेत भ्रष्टाचार सुरू असल्याच्या रोज बातम्या येत आहेत. जनतेने आपल्याला यासाठी निवडून दिलेले नाही. गोरगरिबांच्या विकासासाठी जनतेने आपल्याला या सभागृहात पाठवलेलं आहे, याचेही भान ठेवा, असे सांगतानाच यापुढे अशा गोष्टी कदापिही चालणार नाहीत, त्या खपवूनही घेतल्या जाणार नाहीत, असा सज्जड दमही त्यांनी दिला. यावर्षी राहूदे किमान पुढच्या वर्षी तरी जिल्हा परिषद राज्यात कशी उत्कृष्ट होईल, यासाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

वाचा: ‘फडणवीसांनी राजभवनावर एखादी रूम घ्यायला हवी’

जिल्हा परिषद सभागृह हे सभा घेण्यासाठी, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी आहे, पण इथेच ‘रस्सा मंडळ’ केले जाते. मटणावर ताव मारला जातो. हे बरोबर नाही, असे सांगून ते म्हणाले, ही मटण शिवजून खाण्याची जागा नाही. मटणच हवे असेल तर रोज सर्किट हाऊसला जा, तेथे मी पैसे देऊन ठेवतो, तुम्ही हवं तेवढं मटण खा, असा सल्लाही त्यांनी दिला.

गरीब विद्यार्थ्यांचे काय?

मुश्रीफ पुढे म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते ऑनलाइन शिक्षण घेऊ शकतील. परंतु; गरीब व जेमतेम परिस्थितीमध्ये जगणाऱ्यांसमोर फार मोठं संकट उभारले आहे. अशा परिस्थितीत शिक्षण तज्ञ व राजकीय प्रतिनिधींनी एकत्र येऊन तोडगा काढण्याची गरज आहे. त्यासाठी ज्या सुविधा निर्माण कराव्या लागतील त्याला निधी देण्यासाठी पाठपुरावा करू. ऑनलाइन शिक्षण पद्धती आणि परीक्षांबद्दल केंद्र सरकारने देशात समान सूत्र अवलंबणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वाचा: नक्की खोटं कोण बोलतंय, मोदी की फडणवीस?; राष्ट्रवादीने शब्दात पकडले!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Aurangabad Municipal Corporation: शहरासाठी आठवड्यातून दोन चांगल्या गोष्टी करा! – Aurangabad municipal corporation will has started love Aurangabad campaign under Aurangabad smart city devlopment...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादऔरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून महापालिका शहरात 'लव्ह औरंगाबाद' अभियान सुरू करणार आहे. या अभियानात सहभागी होताना प्रत्येक नागरिकाने...

Vaibhav Mangle Talks About His Experience Of Village Life And People – हळूहळू आम्हाला माणसंही कळायला लागली…वैभव मांगलेच्या गावकडच्या गोष्टी

वैभव मांगलेमाझी बायको मयुरी औषध तयार करणाऱ्या एका प्रसिद्ध कंपनीमध्ये काम करते. आतापर्यंत तिनं स्वतःच्या ज्ञानावर खूप मेहनत घेऊन त्या कंपनीमधल्या क्लिनिकल रिसर्च...

Recent Comments