Home आपलं जग हेल्थ health care tips in marathi : काढ्याचं अतिसेवन करताय? मग जाणून घ्या...

health care tips in marathi : काढ्याचं अतिसेवन करताय? मग जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेली ही माहिती – excessive consumption of kadha can be dangerous for health prevention tips by doctor in marathi


रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या काढ्यांची माहिती देणारे व्हिडीओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ते बघून अनेक जण काढ्याचं सेवन करतात. कित्येकदा करोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी काढ्यांचं अतिप्रमाणात सेवन करतात. याचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत. याबाबत जनरल फिजिशियन
डॉ. संजय शहा यांनी माहिती दिली आहे.

कोविड-१९वरील लशीची प्रतीक्षा अवघं जग करत आहे. आताही करोना विषाणूचा संहार सुरूच आहे. विषाणूचा प्रसार कसा रोखावा, संभाव्य प्रादुर्भाव कसा टाळावा याबद्दलच्या बेसुमार माहितीचा प्रसार सुरू आहे. काही विशिष्ट ‘डीआयवाय इम्युनिटी बूस्टिंग कंकोक्शन्स’च्या सेवनानं स्वत:ला सुरक्षित कसं ठेवावं याची माहिती सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल होत आहे. पण, हे घरी तयार केलेले काढे घेणाऱ्या लोकांना त्याचे साइड-इफेक्ट्स जाणवत आहेत, असं तज्ज्ञांचं निरीक्षण आहे. हे घरगुती उपाय मोठ्या प्रमाणात केले जात असल्यानं ही समस्या वाढत आहे.

(हृदय विकार दूर ठेवण्यासाठी नियमित खा दोन अक्रोड, जाणून घ्या अन्य आरोग्यदायी लाभ)

कोविड-१९ संसर्गाच्या भीतीमुळे काढ्यांचं सेवन वाढलं आहे. त्यात आलं, लिंबू, लसूण, हळद, मिरे, कोरफड आणि बोरवर्गीय फळांचा समावेश होतो. या घरगुती काढ्यांच्या अतिरिक्त सेवनाचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत. हे एका उदाहरणावरुन स्पष्ट करतो. एका तरुण रुग्णामध्ये शस्त्रक्रियेनंतर रक्तस्राव होत असल्याचं आढळलं. रुग्णाच्या केसचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर आणि वैद्यकीय इतिहासाचे तपशीलवार मूल्यमापन केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की, रुग्ण घरी केलेल्या काढ्याचं मोठ्या प्रमाणात सेवन करत होता. त्यामुळे त्याच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव सुरू झाला.

आणखी एका रुग्णाला श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत होता. तो अशक्त झाला होता आणि त्याच्या रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी खालावली होती. चौकशी केली असता असं कळले की, तो ३० वर्षांचा रुग्ण गेल्या पाच महिन्यांपासून घरी केलेल्या काढ्याचं चार ते पाच वेळा सेवन करत होता. रुग्णाने माहितीच्या अभावामुळे अंतर्गत रक्तस्रावाचा धोका ओढवून घेतला होता. तसंच त्याच्या जठरात अल्सर्स झाले होते. त्याला वेळेत रुग्णालयात आणलं गेलं नसतं तर त्याच्यासाठी ते प्राणघातक ठरू शकलं असतं.


(Health Care Tips किती मिनिटे करावा मॉर्निंग वॉक? नियमित व्यायाम केल्यास आरोग्याला मिळतील हे लाभ)
घरगुती मिश्रणांबद्दलचे सोशल मीडियावरील मेसेजेस किंवा जीवनसत्वे व रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचं मार्केटिंग यामुळे प्रभावित होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी, जादूची गोळी किंवा औषध असं काही अस्तित्वातच नसतं. कोविड-१९ आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी हे घरगुती काढे बहुतेकदा घरातील प्रत्येकाला दिले जातात. पण, या काढ्यांना प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगवेगळा प्रतिसाद देते, हे लक्षात घेतलं पाहिजे.

निसर्गाचा नियम आहे की, कोणताही पदार्थ योग्य पद्धतीनं आणि योग्य प्रमाणात सेवन केला असता त्याचा लाभ होतो. पण, ते बेजबाबदारपणे घेतल्यास घातक ठरू शकतो. ज्या व्यक्तींना अन्य काही आजार (कोमॉर्बिडिटीज) आहेत, विशेषत: जे रुग्ण रक्त पातळ करणारी औषधं किंवा अन्य जुन्या आजारांसाठी औषधं घेत असतात त्यांच्यासाठी हे काढे घातक ठरू शकतात. यातून रक्तस्रावाची प्रवृत्ती वाढू शकते. रक्तस्राव कुठून होतो यावरही बरंच काही अवलंबून आहे. काही ठिकाणांहून होणारा रक्तस्राव फार धोकादायक नसतो, तर मेंदू किंवा आतड्यांतून होणारा रक्तस्राव प्राणघातक ठरू शकतो.

(उच्च रक्तदाबाचा त्रास आहे? किडनीचं आरोग्य जपणं का आहे आवश्यक ? जाणून घ्या)
उष्ण मिश्रणांचं सेवन केल्यास तोंडातून रक्तस्राव होणं किंवा अल्सर्स यासारखे साइड-इफेक्ट्स जाणवू शकतात. घरी केलेल्या मिश्रणांतील मसाल्यांमुळे शरीरात अतिरिक्त उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे नाकातून रक्तस्राव होऊ शकतो. यामुळे अन्ननलिकेत घर्षण निर्माण होऊन एसोफॅगीयल इरोजन होऊ शकतं. यातून गॅस्ट्रो-एसोफॅगीयल रिफ्लक्स होऊन पचनावर परिणाम होऊ शकतो. यामुळे रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण होते. हळद किंवा कोरफडीसारखे घटक पदार्थ अतिरिक्त प्रमाणात घेतल्यास त्याने यकृताला धोका पोहोचू शकतो. यकृताला हानी पोहोचली असता किंवा प्रादुर्भाव झाला असता, कावीळ होण्याची शक्यता असते. यामुळेही यकृतात रक्तस्राव होऊ शकतो. परिणामी, प्राणघातक लिव्हर फेल्युअर किंवा दुखापतीत होऊ शकतात.

अर्सेनिक अल्बम हे आणखी एक मोठ्या प्रमाणात वापरलं जाणारं इम्युनिटी बुस्टर आहे. हे मर्यादित आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेतलं तर एखाद्याच्या आरोग्याला लाभदायक ठरू शकतं. पण, याचा अतिरिक्त वापर केल्यास मूत्रपिंड, यकृत किंवा मेंदूवर घातक परिणाम होऊ शकतो. काही वेळा अर्सेनिक टॉक्झिसिटीमुळे रुग्णाची शुद्ध हरपते आणि त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्याची गरज भासू शकते.

‘ड’ जीवनसत्व ही रोगप्रतिकारशक्तीची गरज आहे असा प्रसार मोठ्या प्रमाणात केला जातो. ‘ड’ जीवनसत्व अतिरिक्त झाल्यास शरीरातील कॅल्शिअमचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे व्यक्तीची सतत चिडचिड होणं, काही वेळा शुद्धही हरपणं असे परिणाम दिसू शकतात. ‘ड’ जीवनसत्वाची पातळी वाढल्यामुळे रक्त आणि लघवीतील कॅल्शिअमची पातळी वाढते. यामुळे मळमळ, डिहायड्रेशन, सुस्ती आणि यासारखे अनेक परिणाम दिसू लागतात. हे घटक मर्यादित प्रमाणात आणि वैद्यकीय मार्गदर्शनाखाली घेतल्यास निरुपद्रवी असतात हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. पण, असंतुलित सेवनाचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे जागरूक राहा आणि सुरक्षित राहा. कोणत्याही घरगुती काढ्याचं सेवन करण्यापूर्वी आपल्या फिजिशिअनशी बोला आणि त्यातील प्रत्येक घटकाची भूमिका समजून घ्या. तो किती वारंवार घेणं योग्य आहे ते समजून घ्या. बेजबाबदारपणे काढे घेऊ नका.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Ajinkya raahne: IND vs AUS : विराट कोहलीला कर्णधारपद दिल्यानंतर अजिंक्यने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रीया, म्हणाला… – ind vs aus : ajinkya rahane given...

नवी दिल्ली, IND vs AUS : अजिंक्यने भारताला ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिले. पण त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी अजिंक्यकडून भारतीय संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात...

India Innovation Index: ठाकरे सरकारने करून दाखवले!; ‘या’ यादीत महाराष्ट्राची दुसऱ्या स्थानी झेप – niti aayog announces india innovation index 2020 maharashtra ranked second

मुंबई: नीती आयोगाने २० जानेवारी २०२१ रोजी ' इंडिया इनोव्हेशन इंडेक्स २०२० ' हा आपला दुसऱ्या प्रकाशनाचा निकाल जाहीर केला असून यामध्ये तामिळनाडू...

Recent Comments